क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रक्षंदा खान कित्येक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. रक्षंदा लग्नानंतर छोट्या पडद्यापासून दूर गेली होती. ती आता अदालत २ या मालिकेत काम करणार आहे.अदालत २ ही मालिका काहीच दिवसांत सुरू होणार असून या मालिकेत अभिनेता रॉनित रॉय प्रमुख भूमिका साकारणार आहे. या मालिकेत रक्षंदा एकाच भागात झळकणार आहे. ती यात सरकारी वकीलाची भूमिका साकारत असून तिने काहीच दिवसांपूर्वी यासाठी चित्रीकरण केले.
रक्षंदा खानचा कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 14:51 IST