रक्षंदा परतली छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 18:06 IST
जस्सी जैसी कोई नही, क्योंकी साँस भी कभी बहू थी यांसारख्या मालिकेत झळकलेली अभिनेत्री रक्षदा खान तीन वर्षांनंतर छोट्या ...
रक्षंदा परतली छोट्या पडद्यावर
जस्सी जैसी कोई नही, क्योंकी साँस भी कभी बहू थी यांसारख्या मालिकेत झळकलेली अभिनेत्री रक्षदा खान तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. मुलीच्या जन्मानंतर रक्षंदाने छोट्या पडद्यावर काम करणे बंद केले होते. पण आता तिची मुलगी शाळेत जायला लागली असून ती थोडा वेळ तरी अभिनयाला देऊ शकते असे तिचे म्हणणे आहे. रक्षंदा बालाजी टेलिफ्लिम्सच्या ब्रम्हराक्षस या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत अाहे. संजीव कुमार यांचा गाजलेला चित्रपट जानी दुश्मनप्रमाणे या मालिकेची कथा असणार असल्याचे म्हटले जात आहे.