Ankita Walawalkar Gifts For Dhananjay Powar:बिग बॉसच्या घरामध्ये बऱ्याच कलाकारांची नाती निर्माण होतात. अनेकदा ही नाती घट्ट होतात तर काही नाती संपुष्टात येतात. परंतु, बिग बॉस मराठीच्या ५ व्या पर्वात अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवारमध्ये चांगलीच बॉण्डिंग तयार झाली. बिग बॉसच्या घरात आणि बाहेर असतानाही हे दोघे एकमेकांच्या पाठिशी उभे असलेले पाहायला मिळतात. दरम्यान, आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने अंकिताने लाडक्या डीपीदादासाठी खास गिफ्ट पाठवलं आहे. गेल्यावर्षी बिग बॉसच्या घरात असतानाही अंकिताने डीपीला राखी बांधली होती. पण, यंदा ती कामानिमित्त बाहेरगावी गेली असल्याने तिने या पवित्र दिवशी लाडक्या डीपीदादासाठी राखी पाठवून भावुक पत्रही लिहिलंय. दरम्यान,धनंजय पोवारने त्याच्या युट्यूब चॅनेलवर हा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे,. त्याचदरम्यान तो अंकिताने लिहिलंल पत्र ही वाचताना दिसतोय. या पत्रात अंकिताने लिहिलंय की, "प्रिय डीपी दादा गेल्यावर्षी बिग बॉसच्या घरामध्ये मी तुम्हाला राखी बांधली होती. ते दिवस आठवले की तरी अंगावर काटा येतो. काय करावं काहीच कळत नव्हतं. तेव्हा आपणच एकमेकांचा आधार बनलो. यावर्षी तुमची बहिण काही पूर्वनियोजित कामांमुळे मी भारतात नाही. परंतु, आपलं नातं साजरं झालं पाहिजे. राखी आणि डीपी स्टाईल काही शर्ट तुम्हाला पाठवते आहे. आवडले तर रक्षाबंधनाच्या दिवशी नक्की घाला. राखी ताईकडून बांधून घ्या."
पुढे अंकिताने पत्रात लिहिलंय की, "मला काही गिफ्ट नको, पण खरी गरज असेल तर तेव्हा पाठिशी उभे राहा मला गेल्यावर्षी तुम्ही जो आधार दिला तो मी कधीच विसरणार नाही. अगदी अबोला धरला तरीही नाही. आणि तुम्हाला माहितीची आहे मी जास्त रागावत नाही. आपला भाऊ चुकू नये यासाठी मी बऱ्याचदा तुम्हाला ऐकवते. पण, त्यामागे एकच उद्देश असतो की तुम्ही कमी चुका कराव्यात. त्यासाठी मला तुमच्या बाबांसोबत चर्चेला बसावं लागेल. खूप मोठे व्हा... रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा... तुमचं वादळ
त्यानंतर डीपी त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणतो, "खूप खूप धन्यवाद तुला, मी तुला गिफ्ट देणारच होतो पण, योगायोगाने तू पूर्वनियोजित कामांमुळे भारतात नाहीस. पण, तू जेव्हा भारतात परत येशील तेव्हा तुझ्या आवडीचा ड्रेस, साडी किंवा तुझ्या आवडीचा एखादा गॉगल देण्याचा प्रयत्न करु. खूप खूप प्रेम!"