Join us

VIDEO : राखी सावंतने बॉयफ्रेन्डला भररस्त्यात मागितला ‘KISS’; पुढचं सगळंच ‘शॉकिंग’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 16:10 IST

Rakhi Sawant : राखी व आदिलचे एक ना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता यात आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या राखी व आदिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

राखी सावंत  (Rakhi Sawant ) तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपासून राखी व आदिलचीच चर्चा आहे. राखी आदिल खान दुर्रानीला  (Adil Khan Durrani )डेट करतेय आणि आदिलच्या येण्यानं राखीचं आयुष्यच बदलून गेलं आहे.  राखी व आदिलचे एक ना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता यात आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या राखी व आदिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओ जुना आहे. पण सध्या याच व्हिडीओची चर्चा आहे.

व्हिडीओत राखी नेहमीप्रमाणे मस्ती मूडमध्ये दिसतेय. अचानक भररस्त्यात राखी आदिलकडे किसची डिमांड करते. पण हे काय? आदिल किस देण्याऐवजी मागून तिला मागून लाथ मारतो. यानंतर बेबी क्यों मारा, असं म्हणत राखी जोरात किंचाळते. अर्थात हे सगळं गमती गमतीत सुरू आहे. पण सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे. राखी बिग बॉसच्या घरात जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे आणि याचमुळे राखीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरू लागले आहेत.

काही दिवसांआधी राखीचा एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ती पापाराझींसोबत आदिलबद्दल बोलताना दिसली होती. आदिलला बिग बॉसमध्ये जायला हवं. जेणेकरून त्याचा खरा चेहरा लोकांपुढे येईल. बिग बॉसच्या घरात गेल्यावरच त्याला डाळ पिठाचा भाव कळेल. बिग बॉसच्या घरात रोज पार्टी होते, असं त्याला वाटते. पण तिथे कपडे धुवावे लागतात. भाकरीसाठी संघर्ष करावा लागतो, असं ती म्हणाली होती.  

याआधीही अनेकदा आदिल व राखीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत, यावर अद्यापही लोकांचा विश्वास नाही. केवळ चर्चेत राहण्यासाठी दोघं रिलेशनशिपचं नाटक करत असल्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आता यात किती सत्यता आहे, ते लवकर कळेलच.

टॅग्स :राखी सावंत