'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाचा शंभर दिवसांचा खेळ अखेर संपला आहे. तन्वी कोलते या सहाव्या पर्वाची विजेती ठरली आहे. यावर्षी टॉप-५ मध्ये तन्वीसह विशाल कोटीयन, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद असे दमदार स्पर्धक होते. पण, चाहत्यांची सर्वाधिक मतं मिळवत तन्वीने 'बिग बॉस मराठी'च्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तन्वीच्या या विजयासोबतच सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे 'ड्रामा क्वीन' राखी सावंत हिची.
तन्वीच्या विजयानंतर राखी सावंतने आनंद व्यक्त केला. राखी म्हणाली, "मी म्हटलं होतं की तन्वी जिंकणार आणि तीच जिंकली आहे". यासोबतचं तिने थेट बॉलिवूडचा सुलतान आणि हिंदी बिग बॉसचा होस्ट सलमान खान याच्याकडे एक मोठी मागणी केली आहे. राखीने म्हटले आहे की, "तन्वीला आगामी हिंदी बिग बॉसमध्ये संधी द्यावी". पुढे मिश्किल अंदाजात राखी म्हणाली, "मग मी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन तिची वाट लावेल". यावर राखी आणि तन्वी दोघीही हसल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तन्वीला हा शो जिंकल्यावर 'बिग बॉस मराठी'कडून ट्रॉफी आणि १५ लाखांचा चेक देण्यात आला आहे. याशिवाय पु.ना.गाडगीळ आणि सन्स यांच्याकडून तन्वीला १० लाखांचं Voucher आणि तुनवाल ई-मोटर्सकडून ई-बाईक देण्यात आली आहे. याशिवाय तन्वीला रितेशने 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेली फ्रेम भेट म्हणून दिली. 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासून तन्वी कोलते सर्वत्र चर्चेत आहे. ती मूळची कोकणातील आहे.
Web Summary : Rakhi Sawant celebrated Tanvi Kolte's 'Bigg Boss Marathi 6' win. She requested Salman Khan to give Tanvi a chance in 'Bigg Boss' Hindi, jokingly offering to create drama as a wild card entry. Tanvi won a trophy, ₹15 lakh, a ₹10 lakh voucher, and an e-bike.
Web Summary : राखी सावंत ने तन्वी कोलते की 'बिग बॉस मराठी 6' जीत का जश्न मनाया। उन्होंने सलमान खान से तन्वी को 'बिग बॉस' हिंदी में मौका देने का अनुरोध किया, और मज़ाकिया ढंग से वाइल्ड कार्ड एंट्री के रूप में ड्रामा करने की पेशकश की। तन्वी ने एक ट्रॉफी, ₹15 लाख, ₹10 लाख का वाउचर और एक ई-बाइक जीती।