Join us
Daily Top 2Weekly Top 5

"५-६ लग्न केलीत, कुणीतरी सोमीला वाचवा..", एक्स पती आदिलच्या लग्नावर राखी सावंतने दिली रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 10:59 IST

Rakhi Sawant on Adil khan Durrani : बिग बॉस फेम राखी सावंतचा एक्स पती आदिल खान दुर्रानी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याने बिग बॉस १२ फेम सोमी खानशी लग्न केल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता राखी सावंतने आदिलच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉस फेम राखी सावंत(Rakhi Sawant)चा एक्स पती आदिल दुर्रानी खान (Adil Khan Durrani) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याने बिग बॉस १२ फेम सोमी खानशी लग्न केल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता राखी सावंतने आदिलच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हे ऐकून राखी सावंतला धक्काच बसला आहे.

टेली टॉक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राखीने सांगितले की, ती सध्या दुबईत आहे. जेव्हा तिला विचारण्यात आले की आदिल खानने दुसरं लग्न केलं आहे, तेव्हा तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का? त्यामुळे हे ऐकून राखीला धक्काच बसला. तिचा विश्वास बसत नव्हता.

'आदिलने केलीत ५-६ लग्नं 'त्यानंतर राखीने विचारले की सोमी खान कोण आहे जिच्यासोबत त्याचे लग्न झाले आहे? पुढे राखी म्हणाली की, 'हे धक्कादायक आहे. त्याने अजून घटस्फोटही घेतलेला नाही. आदिलने माझ्याशी लग्न करण्यापूर्वी ५-६ लग्न केली आहेत. त्या मुलींना घटस्फोटही दिला नाही. त्या पण बिचाऱ्या मुली अत्याचार सहन करून पळून गेल्या. त्या सर्वांनी माझ्याशी संपर्क साधला. सोमी खानबद्दल समजल्यावर मला धक्का बसला आहे. आदिलने एका वर्षात तीन लग्न केली.

राखी पुढे म्हणाली की, 'सोमी खानने वास्तव जाणून पुढे यावे. आदिलने मला १ वर्ष खूप घाबरवले. धमक्या दिल्या. आता तो सोमीसोबतही असेच करणार आहे. तू माझे आयुष्य उध्वस्त केलेस. माझे पैसे लुटले. मला रस्त्यावर आणले. तो सोमीशी आधी कोणत्या सेटलमेंटबद्दल बोलत होता, हे मला माहीत नाही. कोणीतरी प्लीज त्या मुलीला वाचवा.

आदिलने सोमीसोबतच्या लग्नाच्या वृत्ताला दिला दुजोराआदिलने सोमीसोबतच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत आदिल म्हणाला, होय, हे खरे आहे. आमचं लग्न झालंय. आमचं लग्न ३ मार्चला मैसूरमध्ये झालं. सोमी खान बिग बॉस १२ मध्ये दिसली होती. तिने तिची बहीण सबा खानसोबत एन्ट्री घेतली होती.

टॅग्स :राखी सावंतबिग बॉस