Join us

राकेश पॉल बनला व्हिलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 11:10 IST

राकेश पॉलची बडे दूर से आये है या मालिकेत लवकरच एंट्री होणार आहे. राकेश या मालिकेत एलियनची भूमिका साकारणार ...

राकेश पॉलची बडे दूर से आये है या मालिकेत लवकरच एंट्री होणार आहे. राकेश या मालिकेत एलियनची भूमिका साकारणार आहे. त्याची भूमिका नकारात्मक असून वसंत घोटालाचा मुलगा २०१५चे त्यानेच अपहरण केले आहे. २०१५ ही चलाखीने त्याच्या कोठडीतून सुटून सनशाईन कॉलनीत जाणार आहे. पण तिथे गेल्यावरही त्याच्या समस्या काही कमी होणार नाहीत. २०१५च्या मार्गात राकेश अनेक विघ्न आणणार आहे.