Join us
Daily Top 2Weekly Top 5

शमिता शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड राकेश बापट रुग्णालयात दाखल, Video शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 15:10 IST

राकेशचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बिग बॉस फेम राकेश बापट (Raqesh Bapat) रुग्णालयात भरती झाला आहे. राकेशने स्वत:च सोशल मीडियावर हाताला सलाईन लावलेला व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. मात्र फोटोत त्याचा चेहरा दिसत नाही. राकेशचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नक्की त्याला झाले काय याबद्दल मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही.

राकेश बापट शेवटचा 'बिग बॉस ओटीटी 1' मध्ये दिसला होता. बिग बॉसमध्ये त्याच्या आणि शमिता शेट्टीच्या अफेअरची चर्चा रंगली होती. घरातून बाहेर आल्यावरही दोघं सोबत दिसायचे. राकेश शमिताच्या कुटुंबासोबतही मिसळला होता. मात्र नंतर काही कारणाने त्यांचं ब्रेकअप झालं. आता त्याने रुग्णालयातील व्हिडिओ शेअर केल्याने चाहते काळजीत पडले आहेत. 

राकेशने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे. मात्र त्याला नक्की काय झालंय याबद्दल त्याने अद्याप माहिती दिलेली नाही. राकेशने 2001 साली आलेल्या 'तुम बिन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. सिनेमातील त्याच्या चार्मिंग लुकवर सगळेच फिदा झाले होते. यानंतर तो टीव्ही मालिका, फिल्म आणि म्युझिक अल्बममध्ये दिसला. तर बिग बॉस ओटीटी मुळे आणि शमितासोबतच्या अफेअरमुळे तो पुन्हा प्रसिद्धीझोतात आला होता.

टॅग्स :राकेश बापटबिग बॉसहॉस्पिटल