Join us

Raju Srivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आहे खूप नाजूक, कुटुंबानं घेतला हा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 20:04 IST

Raju Srivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीच्या संदर्भातील नवीन अपडेट समोर आली आहे.

राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना रुग्णालयात दाखल करून ६ दिवस झाले आहेत. अभिनेता आणि कॉमेडियनची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबाकडून वेळोवेळी अपडेट्स देण्यात येत आहेत. त्याचवेळी चाहते राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यांच्याशी संबंधित पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. हे नवीन अपडेट कळल्यानंतर चाहत्यांची चिंता नक्कीच कमी होऊ शकते. पण अद्याप राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आलेली नाही.

लेटेस्ट हेल्थ अपडेटनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आधीपेक्षा बरीच सुधारणा झाली आहे. कॉमेडियनच्या पर्सनल सेक्रेटरीने अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत नवीन अपडेट दिली आहे. आता राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. तो लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. राजू श्रीवास्तव यांची तब्येत अत्यंत नाजूक आहे.अशा परिस्थितीत त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांना कोणतीही चूक करायची नाही. याच कारणामुळे डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांना भेटण्यास मनाई केली आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या पीआरओनेही त्यांच्या प्रकृतीबाबत आणखी एक अपडेट दिली आहे. त्यांचे पीआरओ अजित सक्सेना यांनी सांगितले की, अभिनेता अद्याप व्हेंटिलेटरवर आहे. या प्रकरणात, संसर्गाचा धोका जास्त असतो. या कारणास्तव, कुटुंबीयांची संमती घेतल्यानंतर, डॉक्टरांनी निर्णय घेतला की अभिनेत्याला भेटायला किंवा त्याच्या बेडजवळ कोणीही जाणार नाही. याशिवाय अनेक प्रियजनांचे संदेश रेकॉर्ड करून राजूच्या कानावर आणून त्यांना कथन केले जात आहे. या प्रयत्नांमुळे राजू यांनी सध्या थोडेफार प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :राजू श्रीवास्तव