Join us

रजनी बदलणार गेटअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 10:28 IST

बहू हमारी रजनी_कांत या मालिकेतील रजनी ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. तिने आपल्या गोड स्वभामुळे आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले आहे. ...

बहू हमारी रजनी_कांत या मालिकेतील रजनी ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. तिने आपल्या गोड स्वभामुळे आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले आहे. पण हीच रजनी आता खलनायिका बनणार आहे. मॅगी आणि सुरीली रजनीला काही चुकीच्या गोष्टी शिकवणार आहे. समायराला शानपासून दूर ठेवण्यासाठी रजनीला खलनायिका बनायला लावणार आहेत. रजनी यासाठी छोट्या पडद्यावरच्या खलनायिकेंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवणार आहे. त्यांच्याप्रकारेच रजनी वेशभूषा, रंगभूषा करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना रजनीची भूमिका साकारणारी रिधीमा पंडित एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.