Join us
Daily Top 2Weekly Top 5

'साराभाई वर्सेस साराभाई'च्या रोशेसवर कर्जाचा डोंगर! अभिनयातून संन्यास घेत वळला होता शेतीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 09:45 IST

Rajesh Kumar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता राजेश कुमार सध्या चर्चेत आहेत. अलीकडेच अभिनेत्याने अभिनय सोडल्यानंतर तो कसा आर्थिक संकटात सापडला, याबद्दल सांगितले.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मध्ये रोसेश साराभाईची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या राजेश कुमार(Rajesh Kumar)ने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एका अभिनेत्यापासून शेतकरी होण्याने त्याच्या आयुष्यात कसे मोठे वळण आले याचा खुलासा केला. शेती करता करता तो कंगाल झाला आणि कर्जबाजारी झाला, याबद्दल सांगितले. 

राजेश कुमारने लेटेस्ट मुलाखतीत सांगितले की, 'साराभाई वर्सेस साराभाई'चा दुसरा सीझन फ्लॉप झाल्यानंतर त्याने अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि अभिनयातून संन्यास घेतला. बिहारमधील गया येथील त्याच्या गावात शेती करण्यास सुरुवात केली. तीन वर्षे शेती करत असताना त्याला स्वतःचे उज्ज्वल भविष्य दिसत होते, पण कोरोना महामारीने त्याच्या आयुष्यात मोठं वादळ आणलं.

अभिनयातून घेतला संन्यास...'साराभाई व्हर्सेस साराभाई' अभिनेता राजेश कुमारने राजश्री अनप्लग्ड यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याने चार वर्षे शेतीसाठी दिली, पण निसर्गाने साथ दिली नाही. राजेश कुमारच्या मते, २०१७ मध्ये मी अभिनय न करण्याचा निर्णय घेतला. मला वाटले की मी एक अभिनेता म्हणून विकास होत नाही, परंतु शेतीच्या जगात मी कोरा कॅनव्हास असलेल्या चित्रकारासारखा होतो. माझी सुरुवात अशी झाली. मी सतत पाच वर्षे शेतीत काम केले आणि प्रत्येक प्रकारे माझे नुकसान झाले. निसर्ग माझ्याशी खेळत राहिला.

डोक्यावर कर्जाचा डोंगरराजेश कुमारने पुढे सांगितले की तो एका झटक्यात कसा कंगाल झाला आणि कर्जाच्या डोंगराखाली दबला गेला. अभिनेता म्हणाला की, मी २० एकर जमिनीवर १५००० झाडे लावली आणि ती पुरामुळे वाहून गेली. चार वर्षे लोटली आणि मग कोरोना साथीच्या रोगाने थैमान घातले. मी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत होतो. लॉकडाऊन दरम्यान, मी माझ्या सर्व बचतीचा वापर केला आणि नंतर कंगाल झालो. माझ्या खिशात काहीच नव्हते. माझ्यावर मोठी कर्जे होती आणि त्यामुळे दबाव वाढला होता. काही काळासाठी राजेश कुमारने त्याच्या वाईट काळाला त्याच्यावर मात करू दिली नाही आणि पुन्हा अभिनयात कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. तो शेवटचा नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'हड्डी' चित्रपटात दिसला होता.