राजेश खेरा तेनाली रामा या मालिकेत दिसणार या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 15:53 IST
तेनाली रामा ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेत तेनाली रामाची भूमिका साकारणाऱ्या कृष्णा भारद्वाजचा अभिनय प्रेक्षकांना खूप ...
राजेश खेरा तेनाली रामा या मालिकेत दिसणार या भूमिकेत
तेनाली रामा ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेत तेनाली रामाची भूमिका साकारणाऱ्या कृष्णा भारद्वाजचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. या मालिकेतील कृष्णा आणि मानव गोहिल यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेत प्रेक्षकांना आता एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता राजेश खेराची एंट्री होणार आहे. राजेशने आजवर छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. राजेशने फार पूर्वी एक ओनिडा टिव्हीची जाहिरात केली होती. ही जाहिरात खूपच गाजली होती. त्याने साकारलेल्या सगळ्याच भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. जस्सी जैसी कोई नही या मालिकेत राजेशने साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तो नुकताच प्रेक्षकांना देव आणि विघ्नहर्ता गणेश या मालिकेत पाहायला मिळाला होता. या दोन्ही मालिकांमध्ये त्याने खूपच वेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. आता तर प्रेक्षकांना राजेश एका वेगळ्याच भूमिकेत आणि लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. तेनाली रामा या मालिकेत आता राजेशची एंट्री होणार असून राजेश या मालिकेत सुलतानची भूमिका साकारणार आहे. सुलतान हा अतिशय दृष्ट राजा दाखवला जाणार असून त्याच्या राज्यातील घडामोडी प्रेक्षकांना तेनाली रामा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. राजेश खेरा या मालिकेत एका वेगळ्या अंदाजात दिसणार असल्याने या भूमिकेसाठी तो खूप उत्सुक आहे. सध्या तो या भूमिकेची जोरदार तयारी करत असल्याचे कळत आहेत. राजेश या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत असला तरी त्याची व्यक्तिरेखा काहीच भागांसाठी असणार आहे. याविषयी राजेश सांगतो, मी या मालिकेत केवळ काही भागांसाठी असलो तरी ही भूमिका मला खूप आवडल्याने मी ही भूमिका साकारण्याचे ठरवले. मी सतत मालिकांमध्ये काम करत असल्याने त्याच त्याच भूमिका साकारताना अनेक वेळा कंटाळा येतो. त्यामुळे मला एक वेगळी भूमिका साकारायची होती. या मालिकेतील माझा लूक देखील खूप छान आणि वेगळा असल्याने मी या मालिकेत काम करण्याचे ठरवले. Also Read : भूमिकेसाठी आळशीपणा सोडला