Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजनंदिनीचा पुनर्जन्म म्हणजे ईशा निमकर? 'तुला पाहते रे' २० वर्षांसाठी जाणार फ्लॅशबॅकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 17:41 IST

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. सध्या या मालिकेतील रंजक कथानकामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. सध्या या मालिकेतील रंजक कथानकामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. आता या मालिकेत शिल्पा तुळसकरची एन्ट्री होणार असून ही मालिका वीस वर्षे मागे जाणार आहे.

सुरूवातीला 'तुला पाहते रे' मालिकेत सामान्य कुटुंबातील ईशा निमकर व बिझनेसमॅन विक्रांत सरंजामे यांच्यातील प्रेमकथेने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला होता. त्या दोघांच्या लग्नानंतर एका मागोमाग एकेक रहस्यांचा उलगडा होऊ लागला आणि विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा ईशा व प्रेक्षकांसमोर आला. ईशा हिच राजनंदिनी असल्याचे सरंजामे घरात सर्वांना वाटत असते. त्यात ईशालादेखील देवीकडे दाद मागायला गेली असताना पाणी असलेल्या परातीत तिच्याऐवजी राजनंदिनीचा चेहरा दिसतो. हा चेहरा राजनंदिनीचा आहे हे ईशाला माहित नाही. मात्र ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असेल, अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. 

लवकरच आगामी भागात राजनंदिनी म्हणजेच अभिनेत्री शिल्पा तुळसकरची एन्ट्री होणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात राजनंदिनीची झलक पहायला मिळते आहे.

तब्बल २० वर्षे मालिका मागे जाणार असून राजनंदीच्या आयुष्याचे आणि त्याचसोबत विक्रांत सरंजामेच्या सगळ्या डावपेचांचा उलगडा होणार आहे. 

नुकताच विक्रांतने ईशाला बंद दरवाज्या पलिकडे नेले. या बंद खोलीचा इतिहास, त्याच्या मागचे रहस्य सगळे आता मालिकेतील आगामी भागात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

मालिकेतला हा नवीन बदल खूपच रंजक ठरेल हे नक्की पण त्याचसोबत मालिकेत आता ईशा निमकर दिसणार नाही का हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कारण मालिका 20 वर्ष मागे गेली तर तेव्हा ईशाचा जन्म ही झालेला नव्हता, त्यामुळे ईशा मालिकेत दिसेल की नाही, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे झी मराठी