Join us

राज-शिल्पा कपिलच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 14:06 IST

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे नाते घटस्फोटपर्यंत पोहोचल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. पण त्यानंतर शिल्पाने तिचा वाढदिवस आपल्या ...

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे नाते घटस्फोटपर्यंत पोहोचल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. पण त्यानंतर शिल्पाने तिचा वाढदिवस आपल्या पतीराजांसोबत साजरा केला आणि त्याचे फोटोही सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले. त्यामुळे आता त्यांच्यात सगळे काही व्यवस्थित असल्याचे म्हटले जात आहे. आता शिल्पा आणि राज कुंद्रा द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत शिल्पाची बहीण शमिताही येणार आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमात राज येणार असल्याची शिल्पाला कल्पनाच नव्हती. तो सुरुवातीला  प्रेक्षकांमध्ये वेश बदलून बसला होता. पण तो प्रश्न विचारायला उठल्यावर शिल्पाला तो राज असल्याची शंका आली. प्रेक्षकांना या  कार्यक्रमात  पहिल्यांदाच राज कुंद्रा पंजाबी पगडीमध्ये पाहायला मिळणार आहे.