Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्रेमाची गोष्ट'मध्ये तेजश्री प्रधानसोबत मुख्य भूमिकेत झळकणार राज हंचनाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 12:54 IST

Premachi Goshta : ४ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

स्टार प्रवाहवर ४ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोला भरभरुन प्रतिसाद मिळत असून नवी गोष्ट आणि नव्या पात्रांना भेटण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. प्रेमाची गोष्टमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान(Tejashree Pradhan)सोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchnale). या मालिकेत तो सागर कोळी हे पात्र साकारणार आहे.

राज हंचनाळे म्हणाला की, ‘प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळेच मला इतकी मोठी संधी मिळाली आहे. मी याआधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी अशी ही व्यक्तिरेखा आहे. सागरचा त्याच्या पत्नीनेच विश्वासघात केल्यामुळे लग्नसंस्थेवर त्याचा विश्वास नाही. मनाने अतिशय चांगला मात्र तितकाच धीरगंभीर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो एका गोड मुलीचा बाबा आहे. लहानग्यांसोबत सीन करणं हा वेगळा अनुभव असतो. त्यांचा अभिनय खूपच निरागस असतो. त्यामुळे अभिनेता म्हणून ही भूमिका साकारताना माझा कस लागतोय. 

तो पुढे म्हणाला की, मालिकेची संपूर्ण टीम खूप छान आहे. मालिकेच्या प्रोमोला जो भरभरुन प्रतिसाद मिळतोय तोच प्रतिसाद आमच्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका प्रेमाची गोष्ट ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत राणादाच्या भावाची भूमिका राज हंचनाळेने साकारली होती. या भूमिकेतून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तसेच त्याने 'जिवाची होतीया काहिली' या मालिकेतही काम केले आहे. आता त्याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :तेजश्री प्रधान राज हंचनाळे