Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल्या या मुलीवर ‘लई कॉन्फिडन्स’ने झालाय लट्टू… कोण आहे त्याची गर्लफ्रेंड? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 12:23 IST

छोट्या पडद्यावरील अज्या आणि शीतलीचा बहुप्रतिक्षित विवाहसोहळा नुकताच पार पडला. फौजी अज्या आणि शीतलीच्या या लग्नात साऱ्यांनीच धम्माल मस्ती ...

छोट्या पडद्यावरील अज्या आणि शीतलीचा बहुप्रतिक्षित विवाहसोहळा नुकताच पार पडला. फौजी अज्या आणि शीतलीच्या या लग्नात साऱ्यांनीच धम्माल मस्ती केली. यावेळी नववधू वरासह साऱ्यांच्याच नजरा राहुल्यावर खिळल्या होत्या. अज्या आणि शीतलीचा कॉमन फ्रेंड असणाऱ्या राहुलने या लग्नात मनोरंजन केलंय. ‘मला लई कॉन्फिडन्स हाय’ असं म्हणणारा राहुल्या लागीर झालं जी मालिकेतील साऱ्यांच्या पसंतीचं पात्र ठरत आहे. अज्याच्या लग्नाची जबाबदारीही राहुल्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली. मात्र तोच या लग्न सोहळ्यात प्रेमात क्लीनबोल्ड झाला आहे. सध्या राहुल्या प्रेमात हरवून गेल्याचे पाहायला मिळत आहे. शीतलीच्या लग्नासाठी आलेल्या तिच्या मैत्रिणींपैकी ‘कोमल’ हिच्यावर राहुल्या फुल टू फिदा झाला आहे. कोमल अज्या शीतलीच्या लग्नात वावरताना दिसली.लग्नात अगदी सूटबूट, गॉगल घालून राहुल्या कोमलला पटवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. दुसरीकडे कोमल तिच्या बॉयफ्रेंडबद्दलचा उलगडा पूजेच्या दिवशी करणार आहे.त्यामुळे ती राहुल्याचे नाव घेते की आणखी कुणाचं याची रसिकांना उत्सुकता आहे. या कोमलचं खरं नाव निकिता कुलकर्णी असं आहे.ती मूळची साताऱ्याचीच असून तिचं वय २१ वर्षे असल्याचे बोललं जातंय. साताऱ्याच्या अनंत इंग्लिश माध्यमिक शाळेतून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर धनंजयराव गाडगीळ कॉलेज सातारामधून पदवी शिक्षण पूर्ण केले.बालपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. त्यामुळे शिक्षणासोबत भरतनाट्यमचे धडेही घेतले आहेत. तिने आपल्या नृत्याचे बरेचसे स्टेज शोसुद्धा केले आहेत. ‘लागीर झालं जी’ ही तिची पहिलीच मालिका आहे. cnxoldfiles/a>कारण राहुल्याचे वडिल हेसुद्धा आर्मीत होते.सध्या ते रिटायर झाले असले तरीसुद्धा आर्मीत राहणाऱ्या माणसांचे आयुष्य काय असते हे राहुल्याने अनुभवले आहे.वडील आर्मीत असल्याने बालपणी राहुल्याची काय अवस्था झाली असेल,त्याच्या मनाची काय अवस्था असेल हेच सांगणारा एक व्हिडीओ मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हिडीओमध्ये राहुल्याला डोळ्यात टचकन पाणी आल्याचे पाहायला मिळालं होतं.