Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याशी लग्न करशील? ‘ बिग बॉस 14 ’ स्पर्धक राहुल वैद्यने नॅशनल टीव्हीवर प्रेयसीला केले हटके प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 12:07 IST

कोण आहे राहुलची गर्लफ्रेन्ड, कशी झाली पहिली भेट?

ठळक मुद्देदिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती.

‘बिग बॉस 14’चा स्पर्धक राहुल वैद्यने काय करावे तर, नॅशनल टेलिव्हिजनवर जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली. केवळ इतकेच नाही तर आपल्या प्रेयसीला ‘बिग बॉस’ चाहत्यांच्या साक्षीने थेट लग्नाची मागणी घातली. बिग बॉसच्या घरात सर्वांसमोर त्याने अगदी अनोख्या पद्धतीने प्रेयसीला प्रपोज केले. राहुल वैद्यच्या प्रेयसीचे नाव काय तर दिशा परमार.दिशा परमारच्या वाढदिवशी तिला अविस्मरणीय भेट देण्याचे राहुलने आधीच ठरवले होते. त्यानुसार त्याने प्रेयसीला बिग बॉसच्या घरात हटके पद्धतीने प्रपोज केले. बिग बॉसने एका प्रोमोमध्ये याची झलक दाखवली आहे.

 आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. दोन वर्षांपासून एक मुलगी माझ्या आयुष्यात आहे. तिचे नाव दिशा परमार. दिशा तू जगातील सर्वांत सुंदर मुलगी आहे. मला माहित नाही,  तुझ्यावर प्रेम आहे, हे सांगायला मला इतका वेळ कसा काय लागला. माझ्याशी लग्न करशील का?  मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय, असे म्हणत राहुल वैद्य ‘बिग बॉस’च्या घरात दिशाला प्रपोज करतो. राहुलचा दिशाला प्रपोज करतानाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

राहुल हा एक गायक आहे. बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी तो नेटाने प्रयत्न करताना दिसतोय. दोन वर्षांपासून राहुल दिशाला डेअ करतोय. दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. प्यार का दर्द या टीव्ही शोमध्ये तिने काम केले आहे

 अशी सुरु झाली लव्हस्टोरीदिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती. या म्युझिक व्हिडीओत दोघांनी एकत्र काम केले होते. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड भावली होती. या व्हिडीओनंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 

टॅग्स :बिग बॉस १४