Join us
Daily Top 2Weekly Top 5

राघवने दिली कामाला पहिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 13:34 IST

डान्स प्लस या शोचा दुसरा सिझन लवकरच सुरू होणार आहे. राघव जुयाल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. राघव हा ...

डान्स प्लस या शोचा दुसरा सिझन लवकरच सुरू होणार आहे. राघव जुयाल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. राघव हा नेहमीच सगळ्यांना त्याच्या कॉमिक टायमिंगमुळे खळखळून हसवतो. त्याचा स्लो मोशनमधील डान्सही खूपच प्रसिद्ध आहे. या सगळ्यामुळे राघव डान्स प्लसच्या टीममधील सगळ्यांचा लाडका आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या चित्रीकरणाच्यादिवशीच राघवला थोडा ताप होता. पण त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. चित्रीकरण संपेपर्यंत राघवचा ताप इतका वाढला होता की त्याला रात्री रुग्णायलात दाखल करण्यात आले. राघव रुग्णालयात असल्याने तो दुसऱ्या दिवशी चित्रीकरणाला येणार नाही अशी सर्वांना खात्री होती. पण त्याही अवस्थेत राघवने सेटवर येऊन चित्रीकरण पूर्ण केले. काहीही झाले तरी कामाला पहिली पसंती दिली गेली पाहिजे ही गोष्ट त्याने सिद्ध केली.