Join us

शनायामुळे राधिकाच्या जीवाला धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 07:15 IST

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास २ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय.

ठळक मुद्देनुकतंच मालिकेत नवीन शनायाची एंट्री झाली शनाया राधिकाचा बदला घेण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहे

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास २ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. 

नुकतंच मालिकेत नवीन शनायाची एंट्री झाली आणि त्यामुळे मालिका अजूनच रंजक बनत चालली आहे. शनाया राधिकाचा बदला घेण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहे. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि शनयाच्या अशाच एका चालीमुळे राधिकाच्या अपघात झाला. राधिका शनायामुळे तिच्या जीवाला मुकणार का? तर आगामी भागात प्रेक्षक पाहू शकणार आहेत कि राधिका तिच्या अपघातामुळे कोमामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे राधिकाच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे. आता कुठे राधिकाच्या एक यशस्वी उद्योजिकेच्या प्रवासाला सुरुवात झाली होती पण त्याला देखील शनायाने ग्रहण लावलं. आता राधिकाच्या गैरहजेरीत तिच्या ऑफिसचं कामकाज कोण पाहणार? राधिकाच्या अपघातामुळे शनायाला तिच्या वागण्याचा पश्चाताप होणार का? गुरुनाथला खरंच त्याच्या चुकांची जाणीव होऊन तो राधिकाच्या काळजी घेणार का? हे पाहणं रंजक ठरेल.

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोईशा केसकर