Join us

राधेला शोध त्याच्या 'ड्रीम गर्ल'चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 10:13 IST

गोड रूप, मन मोहून टाकणारे स्मितहास्य आणि लाघवी स्वभाव यामुळे कोणाचेही मन लगेच जिंकून घेणारा राधेलाल शुक्ला.राधे ही भूमिकेत ...

गोड रूप, मन मोहून टाकणारे स्मितहास्य आणि लाघवी स्वभाव यामुळे कोणाचेही मन लगेच जिंकून घेणारा राधेलाल शुक्ला.राधे ही भूमिकेत छोट्या पजद्यावर झळकत आहे. ‘कृष्णा चली लंडन’ या नव्या मालिकेतून तो रसिकांच्या भेटीला येत आहे.कानपूरमध्ये घडणा-या या मालिकेचा नायक राधे हा तसा स्वप्नाळू स्वभावाचा असून आपल्या पत्नीच्या शोधात असतो.राधे हा कानपूरमध्ये राहणारा 21 वर्षांचा देखणा तरुण असतो.त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी स्वाभाविक असली, तरी राधेचे एकच स्वप्न असते ते म्हणजे लग्न करणे. जिच्याबरोबर बाइकवर बसून मस्त फिरायला जाता येईल, चाट आणि पाणीपुरी खाता येईल,शुक्रवारी संध्याकाळी नवा सिनेमा पाहता येईल आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करता येईल, अशा आपल्या भावी अर्धांगिनीच्या शोधात तो असतो. हेच राधेचं खरं स्वप्न असतं. लग्नानंतर अगदी रोमँटिक जीवन जगण्याची त्याची कल्पना असते. तो स्वत: नववी इयत्ता नापास असला आणि त्याच्या जीवनात कोणतेही ध्येय व आकांक्षा नसल्या, तरी आपल्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची त्याचा निर्धार असतो.त्याच्या कुटुंबात तो सर्वात लहान असल्याने सर्वांचा लाडका असतो.पण कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्याला काही स्थान नसते. पण त्याचा निरागस आणि आकर्षक स्वभाव सर्वांचे मन जिंकून घेत असे.त्याला नृत्य करायला फार आवडतं.1990 च्या दशकातील गाण्यांचा तो चाहता असतो.आपल्याला जीवनात सर्व काही मिळाले आहे,अशी त्याची भावना असते- उत्तम कुटुंबीय, उत्तम मित्र, सुखासीन जीवन आणि आता त्याला त्याची पत्नी मिळाली की त्याचे जीवन परिपूर्ण होईल, अशी त्याची समजूत असते.आपल्या राधे या व्यक्तिरेखेबद्दल गौरव सरीन म्हणाला, “राधेसारखी भूमिका क्वचितच साकारायला मिळते.त्याच्या या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत, ज्यामुळे ही भूमिका फारच कुतुहलजनक बनली आहे. तो स्वप्नाळू आणि प्रेमळ असून आपल्या पत्नीचं प्रेम प्राप्त करण्यासाठी तो काहीही करण्यास तयार असतो.त्याचं मन साफ आणि निर्मळ असतं आणि मुळात त्याची वृत्तीच प्रेमळ असते. त्याच्या स्वभावाला असलेल्या या विविध पदरांमुळेच ही भूमिका पडद्यावर साकारणं हे एक आव्हान असलं, तरी मी ते पेलण्यातला आनंद अनुभवत आहे.” मालिकेचे लेखक आणि निर्माते सौरभ तिवारी म्हणाले, “‘कृष्णा चली लंडन’सारखी मालिका आपल्या प्रेक्षकांपुढे सादर करण्याचा निर्णय ‘स्टार प्लस’ने घेतल्यामुळे मी त्यांचा अतिशय आभारी आहे. या मालिकेची संकल्पना मला सात वर्षांपूर्वी सुचली होती आणि राधेची व्यक्तिरेखा ही माझ्या कुटुंबातील एका ख-या व्यक्तीवर आधारित आहे.त्यामुळे या मालिकेची संकल्पना वास्तवावर आधारित असून ती प्रेक्षकांना नक्कीच पटेल आणि आवडेल अशी आहे.ही मालिका खूपच रंजक असून तिची कथाही खूप तितकीच मजेशीर आहे.या मालिकेतून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.