Join us
Daily Top 2Weekly Top 5

​गोठ या मालिकेत राधाने केली विलासची नक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 17:45 IST

गोठ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या ...

गोठ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील राधा आणि विलास हे तर प्रेक्षकांचे प्रचंड लाडके बनले आहेत. या दोघांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांच्या चाहत्यांनी नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून वीरा असे त्यांच्या जोडीचे नामकरणदेखील केले आहे.सध्या गोठ या मालिकेत राधा आणि विलास यांचे नाते चांगलेच फुलू लागले आहे. ते दोघे आता हनिमुनला गेले असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राधा आणि विलास यांना कळू न देता सुलेखा आणि दीप्ती त्यांना हनिमूनला पाठवण्यात यशस्वी होणार आहेत. त्यांना दोघे विलासच्या आजीच्या घरी अंदळगावला पाठवणार आहेत. तिथे गेल्यावर सजवलेल्या खोलीमुळे त्यांना आपल्याला हनिमूनला पाठवण्यात आले आहे याची कल्पना येणार आहे. विलास राधाला त्या खोलीत झोपायला सांगणार असून आपली बॅग दुसऱ्या खोलीत घेऊन जाणार आहे. पण खोलीत गेल्यावर त्याने चुकून राधाची बॅग आणली असल्याचे त्याच्या लक्षात येणार आहे. इकडे राधा विलासचे कपडे घालून आरशासमोर उभी राहाणार असून त्याच्या कपड्यात स्वतःला पाहून ती हरवून जाणार आहे आणि नकळतपणे तिच्या ननात असलेले विलासचे चित्र तिच्या समोर येणार आहे आणि ती विलासची नक्कल करणार आहे.राधाची ही नक्कल पाहिल्यानंतर आता विलास त्यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहाणे मजेशीर ठरणार आहे.गोठ या मालिकेच्या कथानकाला आता चांगलेच वळण मिळणार असून राधा आणि विलासच्या नात्याला एक नवीन दिशा मिळणार आहे.