Join us
Daily Top 2Weekly Top 5

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये प्रेम आणि राधाचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 15:52 IST

राधा आणि प्रेमच्या जीवाला कोणापासून धोका आहे ? संगीता दीपिकाला लल्लनच्या आयुष्यामधून काढून टाकण्यामध्ये यशस्वी होईल का ? राधा प्रेमला वाचवू शकेल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे.

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी होत असताना राधा आणि प्रेमचा जीव आता धोक्यात आहे. दीपिकाचा व्यवसाय आणि आयुष्य मार्गी लागण्यासाठी प्रेमचे बरेच प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे संगीता म्हणजेच लल्लनची बहीण प्रेमच्या घरी घेऊन त्याला लल्लन समजून बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते परंतु तिला हे माहिती नाही कि, तो लल्लन नसून प्रेमच आहे. संगीताला लल्लनच्या आयुष्यामधून दीपिकाला कायमचे काढून टाकायचे आहे. याच दरम्यान राधाला एक वाईट स्वप्न पडते ज्यामध्ये प्रेमबरोबर काहीतरी वाईट होणार आहे असे संकेत तिला मिळतात. राधा आणि प्रेमच्या जीवाला कोणापासून धोका आहे ? संगीता दीपिकाला लल्लनच्या आयुष्यामधून काढून टाकण्यामध्ये यशस्वी होईल का ? राधा प्रेमला वाचवू शकेल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे.

हे सगळ घडत असतानाच एकीकडे शिर्के प्रेमला प्रियाने माधुरीला सांगितलेलं सत्य सांगतात... कि, लल्लन आणि प्रेम जुळी मुल असून या दोघांचे वडील विश्वनाथ आणि आई देवयानी आहे. आणि हे सत्य कळल्यावर माधुरीने घर सोडून दिले आहे. माधुरी आणि विश्वनाथ मध्ये झालेले गैरसमज प्रेम सोडवू शकेल का ? प्रेम विश्वनाथ परांजपे यांना भेटल्यावर का सांगेल ? हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. दुसरीकडे प्रेम शिर्केना  दीपिकाला कोणीतरी फोन करून लल्लन पाटील कोण आहे, जो तिच्यासोबत आहे तो प्रेम नाहीये, संगीता लल्लनचीच बहीण आहे ही माहिती देत आहे, आणि ही माहिती देणारी व्यक्ती कोणालाच माहिती नाही. हा सगळा गुंता राधा – प्रेम कसा सोडवणार ? राधा – प्रेमच्या जीवाला कोणापासून धोका आहे ? राधा प्रेमला कशी वाचवणार ? हे सगळ जाणून घेणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :राधा प्रेम रंगी रंगली