Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘राधा कृष्णा’ मालिका थंड बस्त्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 12:27 IST

छोट्या पडद्यावरील बहुप्रतिक्षित पौराणिक मालिका राधा कृष्णा रसिकांच्या भेटीला येण्याआधीच गुंडाळण्यात आल्याचं बोललं जातंय. सुरुवातीला क्रिएटिव्ह आय या प्रोडक्शन ...

छोट्या पडद्यावरील बहुप्रतिक्षित पौराणिक मालिका राधा कृष्णा रसिकांच्या भेटीला येण्याआधीच गुंडाळण्यात आल्याचं बोललं जातंय. सुरुवातीला क्रिएटिव्ह आय या प्रोडक्शन हाऊसमार्फत या मालिकेची निर्मिती होणार होती. मात्र चॅनेलनं ही मालिका क्रिएटिव्ह आयकडून काढून घेत त्याची जबाबदारी स्वस्तिक प्रॉडक्शन्सला दिली. क्रिएटिव्ह आय या प्रॉडक्शन हाऊसकडून कलाकारांची निवड आणि इतर प्रक्रियेत विलंब लागत असल्यानं चॅनेलनं निर्मिती संस्था बदलल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर स्वस्तिक प्रॉडक्शन्सकडून मालिका लवकरात लवकर रसिकांच्या भेटीला आणण्यासाठी जोरदार सुरुवात केली. निर्मात्यांनी कलाकारांची निवड प्रक्रिया राबवत अभिनेत्री प्रितीका राव आणि अभिनेता प्रियांक यांना डच्चू देत त्यांच्या जागी सुमेध मुद्गलकर आणि मल्लिका सिंग यांची निवड केली. नव्या कलाकारांसह स्क्रीप्ट आणि इतर गोष्टीही ठरवण्यात आल्या. मात्र तरीही चॅनेल आणि प्रॉडक्शन हाऊस यांची विविध विषयांवर मतमतांतरं होती. ब-याच गोष्टींमध्ये एकवाक्यता नसल्यानं या बहुप्रतिक्षित मालिकेला थांबवण्याचा निर्णय चॅनेलनं घेतल्याचं समजतंय.