Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कबुल है' मालिकेतल्या अभिनेत्याचे पार पडलं शुभमंगल, लग्नाचा पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 16:47 IST

मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत हे शुभकार्य उरकल्याचं विक्रमने सांगितलं. सध्याच्या कठीण काळात त्यांनी हा निर्णय का घेतला, हे स्पष्ट करणारी एक पोस्टही त्यांनी शेअर केली आहे.

कोरोना काळातही गेल्या काही महिन्यांपासून अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. आपल्या जोडीदारासह अनेकांनी जीवनाची नवी इनिंग सुरू केली. आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता विक्रम सिंहने गर्लफ्रेंड स्नेहासह लग्नबंधनात अडकत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडलं.

 

स्नेहा शुक्लाचा अभिनयाशी संबंध नसून ती पेशाने वकिल आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता कमी लोकांच्या उपस्थितीच हे लग्न पार पडले. समोर आलेल्या फोटोंमध्ये सोशल डिस्टंसिंग, चेह-यावर मास्क अशी खबरदारी प्रत्येकाने यावेळी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.  या लग्नसोहळ्यात कोणताही थाटमाट, बडेजावपणा बिल्कुल नव्हता.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी सुरक्षा आणि काटेकोर नियमावली पाळावी लागत आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत विक्रम सिंह आणि स्नेहा शुक्ला यांचा विवाहसोहळा साधेपणानं पार पडला. मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत  हे शुभकार्य उरकल्याचं विक्रमने सांगितलं. सध्याच्या कठीण काळात त्यांनी हा निर्णय का घेतला, हे स्पष्ट करणारी एक पोस्टही त्यांनी शेअर केली आहे.

विक्रम सिंहने चाहत्यांसह फोटो शेअर करताच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा फोटो शेअर करत विक्रम सिंहने म्हटले की, कोरोना संदर्भातील सगळ्या नियम अटींनुसार आम्ही फक्त कुटुंतील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितील लग्नबंधनात अडकलो. लग्नात फारसा गाजावाजा न करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. त्यामुळे छोटासा लग्न सोहळा कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. नातेवाइक, मित्रमंडळी यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेता आलं नाही, याचं काही क्षण वाईट वाटलं; पण सध्याच्या परिस्थितीत ते अत्यंत आवश्यक आहे. यावेळी जवळचे मित्र मंडळी नातेवाईक यांनाही आम्ही खूप मिस केल्याचे त्याने म्हटले आहे.

 “दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता आमिपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे” अशी प्रतिक्रिया मित्रमंडळी करताना दिसत आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस