Join us

प्रियांशू जोराने दिली 'या' अभिनेत्रीवर क्रश असल्याची कबूली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 12:14 IST

माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ताने तिच्या सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व आणि मोहकतेसह प्रेक्षकांना आकर्षून घेतले आहे. आकर्षक व्यक्तिमत्त्व व मोहकता कायम राखत ...

माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ताने तिच्या सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व आणि मोहकतेसह प्रेक्षकांना आकर्षून घेतले आहे. आकर्षक व्यक्तिमत्त्व व मोहकता कायम राखत तिने आपल्या सौंदर्यासोबतच भाषेच्या चपखल वापराने चाहत्यांना अचंबित केले आहे. आपली बुद्धीमत्ता व हुशारीसह सर्वांना अचंबित केलेल्या या सौंदर्यवतीने शो 'हाय फिव्हर' वरील फक्त १४ आठवड्यांमध्येच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचे विनोदी व भावनाप्रद विनोद, हृदयस्पर्शी संदेश आणि तिचे हास्य यामुळे प्रेक्षकांना तिचे अधिकाधिक बोल ऐकावेसे वाटतात. कदाचित ती कोणासाठी मैत्रिण, मार्गदर्शक किंवा आई असेल, पण ती शोवर कोणाची तरी क्रश देखील आहे.शोचा एपिसोडमध्ये सूत्रसंचालक प्रियांशू जोराने या अभिनेत्रीसाठी असलेल्या आपल्या प्रेमभावनेची कबूली दिली. प्रियांशू चेह-यावरील स्मित हास्य व आनंदासह म्हणाला, 'माझे तुझ्यावर क्रश होते आणि आजही आहे. तो म्हणाला, हा शो सुरू होण्यापूर्वी मी तुझ्या चित्रपटांपैकी एक पार्टनर चित्रपटामधील एक गाण्यामध्ये तुला पाहण्याच्या आठवणींना उजाळा दिला. मी सांगू शकत नाही की तुझा अभिनय पाहून मी किती अचंबित झालो होतो.आपल्या मनातील इच्छा पूर्ण करत सुत्रसंचालकाने त्याच गाण्यावर अभिनेत्रीसोबत नृत्य करण्याची संधी सोडली नाही.अभिनेत्रीच्या मोहकतेबाबत अधिक बोलत प्रियांशू म्हणाला, ''मी लारा दत्ताला नेहमीच ती सर्वांना प्रचलित असलेली सौंदर्यवती व सुंदर व्यक्ती म्हणून ओळखले आहे. तिच्यासोबत काम केल्यानंतर मला तिच्याबाबत अधिक समजले. ती मनाने अत्यंत चांगली व सुंदर व्यक्ती आहे. तिला ओळखण्यापूर्वी माझे तिच्यावर क्रश होते.पण मी कधीच कल्पना केली नव्हती की ती मनाने इतकी चांगली असेल. तिच्यासोबत बोलण्याची, संवाद साधण्याची संधी या मंचाने दिली. मला तिच्यासोबत कोणत्याही वादविवादाशिवाय उत्तम नाते शेअर करण्याची संधी दिली. मला ही संधी मिळाल्याने मी शोचे आभार मानतो.