Join us
Daily Top 2Weekly Top 5

या टीव्ही कलाकारांसह प्रियंकाने बनवला 'लघुपट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 14:48 IST

बॅालिवूडसह हॅालिवूडमध्येही आपला जलवा दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रासह काम करायला मिळणं कोणत्याही कलाकारासाठी सुवर्णक्षण असतो. असेच काहीसे घडलंय 'बालिका ...

बॅालिवूडसह हॅालिवूडमध्येही आपला जलवा दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रासह काम करायला मिळणं कोणत्याही कलाकारासाठी सुवर्णक्षण असतो. असेच काहीसे घडलंय 'बालिका वधू' फेम शशांक व्यास आणि 'नागिन' फेम अदा खान यांच्यासोबत. प्रियंकाने नुकतेच सात मिनिटांच्या एका लघुपटाची निर्मिती केलीय. यात अदा खान आणि शशांक व्यास यांच्या प्रमुख भूमिका आहेत.काही दिवसांपूर्वीच प्रियंकाने भोजपुरी 'बम बम बोल रहा है काशी' आणि मराठीत 'व्हेंटिलेटर' या सिनेमाची निर्मिती केलीय. डिजीटल मीडियाकडे रसिकांचा वाढता कल बघता प्रियंकाने आता डिजीटल वर्ल्डमध्येही आपले पाऊल टाकले आहे. 'एक खुबसूरत इंतफाक' असे या लघुपटाचे नाव असून यात आणखी काही टीव्ही कलाकार झळकणार आहेत.