Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्राने एकदा नव्हे तर अनेकवेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 08:00 IST

प्रियांकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हा खुलासा प्रियांकाचे एक्स मॅनेजर प्रकाश जाजू यांनी काही वर्षांपूर्वी केला होता. त्यांनी एक ट्वीट करून याबाबत सांगितले होते.

प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच सध्या हॉलिवूडमध्ये देखील तिने तिच्या अभिनयाने एक जागा निर्माण केली आहे. ती बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध आहे. प्रियांकाने आज तिच्या मेहनतीने तिचे एक स्थान निर्माण केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, प्रियांकाने तिच्या करियरमध्ये खूपच स्ट्रगल केला आहे. प्रियांकाने तिच्या संघर्षाच्या काळात दोन-तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रियांकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हा खुलासा प्रियांकाचे एक्स मॅनेजर प्रकाश जाजू यांनी काही वर्षांपूर्वी केला होता. त्यांनी एक ट्वीट करून याबाबत सांगितले होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी एक ट्वीट केले होते. त्यात म्हटले होते की, प्रियांका ही कठोर मनाची दिसत असली तरी ती तिच्या स्ट्रगलिंगच्या दिवसांमध्ये खूपच कमकूवत होती. तिने दोन ते तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण मी तिला प्रत्येक वेळी ते करण्यापासून थांबवले. प्रियांका त्या काळात असीम मर्चंट सोबत नात्यात होती. त्यावेळी अनेकवेळा प्रियांका आणि असीम यांची भांडणं होत असत. त्यावेळी प्रियांका रात्रीच्या वेळी देखील मला फोन करून खूप रडायची. एकदा तर तिचे असीमसोबत भांडण झाल्यानंतर ती वसईला आत्महत्या करायला देखील गेली होती. पण त्या वेळी देखील मी तिला अडवले. तसेच असीमची आई प्रियांकाच्या खूपच जवळची होती. २००२ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर प्रियांकाने बिल्डिंगमधून खाली उडी मारायचा देखील प्रयत्न केला होता. त्यामुळे लगेचच तिच्या घरातील खिडक्यांना ग्रील लावण्यात आले होते. जोपर्यंत हे काम सुरू होते, तोपर्यंत अक्षरशः प्रियांकाला खुर्चीवर बांधून ठेवण्यात आले होते. प्रियांका आणि प्रकाश जाजू यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांत खूपच बिघडले आहेत. प्रियांकाला मानसिक त्रास दिल्याबद्दल त्यांना अटक देखील करण्यात आली होती. जाजूंनी प्रियांकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितल्यानंतर काहीच दिवसांनी प्रियांकाने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, मला त्रास दिल्यामुळे जी व्यक्ती तुरुंगात आहे अशा व्यक्तीवर मीडिया विश्वासच कशी ठेवू शकते हेच मला कळत नाहीये. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा