Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोपडामुळेच नवप्रित बांगाने ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यास दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 17:08 IST

सध्या रिअ‍ॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस’च्या सीजन ११ ची सर्वत्र चर्चा रंगत आहे. या सीजनचे वैशिष्ट्य म्हणजे सीजनसाठी प्रियंका ...

सध्या रिअ‍ॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस’च्या सीजन ११ ची सर्वत्र चर्चा रंगत आहे. या सीजनचे वैशिष्ट्य म्हणजे सीजनसाठी प्रियंका चोपडाचे नाव समोर येत आहे. आता तुम्ही म्हणाल की, प्रियंका चोपडा आणि ‘बिग बॉस’चे काय कनेक्शन? तर प्रियंकाचा जरी ‘बिग बॉस’शी थेट संबंध नसला तरी, तिच्यासारखी हुबेहूब दिसणाºया नवप्रित बांगा हिचे नाव सध्या या शोबरोबर जोडले जात आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, या शोमध्ये नवप्रित सहभागी होणार आहे. मात्र आता येत असलेल्या माहितीनुसार तिने शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला असून, त्याचे कारण प्रियंका चोपडा आहे. अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्यासारखीच हुबेहूब दिसणारी नवप्रित स्टाइलच्या बाबतीतही प्रियंकाचीच कॉपी आहे. तिच्या या लूकनेच तिला प्रियंकाची डुप्लिकेट अशी ओळख निर्माण करून दिली. परंतु आता तिला ही ओळख खटकत असल्याचे समजते. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत नवप्रितने सांगितले की, ‘काही दिवसांपूर्वी एक लेख माझ्या वाचण्यात आला. त्यामध्ये लिहिले होते की, मला ‘बिग बॉस’च्या घरात संधी देण्याबाबत विचार केला जात आहे. त्यानंतर काही दिवसांतच मला याकरिता ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांकडून संपर्कही साधला गेला. त्यांनी मला बिग बॉसच्या घरात येण्याबाबत विचार करायला सांगितले. परंतु मी त्यांना एक क्षणाचाही विलंब न करता नकार दिला.’नकाराचे कारण सांगताना नवप्रितने म्हटले की, ‘बिग बॉस’ शोच्या निर्मात्यांच्या मते, मी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करायला हवे. कारण लोकांच्या मते माझा चेहरा प्रियंका चोपडाच्या चेहºयाशी मिळता-जुळता आहे. हेच कारण मला खटकले अन् मी त्यांना नकार दिला. कारण मला कोणाची ओळख घेऊन पुढे जायचे नाही. मी कशी दिसते हे मला चांगले माहीत आहे. त्यासाठी मला शोमध्ये जाऊन स्वत:ला सिद्ध करायची आवश्यकता नाही. मी माझी ओळख स्वत: बनविली आहे. मला नवप्रित बांगा म्हणून ओळखल्यास गर्व वाटतो. त्यामुळे लोकांनी मला दुसºयाच्या नावाने ओळखावे, असे मला अजिबातच वाटत नाही. मी माझ्या आयुष्यात पुढे जाऊ इच्छिते, असेही नवप्रितने स्पष्ट केले.