Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हर मर्द का दर्द' मालिकेत प्रिया रैनाची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 17:21 IST

प्रिया रैनाची मालिकेत एंट्री होणार म्हटल्यावर काहीतरी हटके असणार हे काही वेगळे सांगायला नको. मालिकेत ती मिस रस्तोगीची भूमिका ...

प्रिया रैनाची मालिकेत एंट्री होणार म्हटल्यावर काहीतरी हटके असणार हे काही वेगळे सांगायला नको. मालिकेत ती मिस रस्तोगीची भूमिका साकारेल आणि नायक विनोद खन्ना ऊर्फ फैसल रशिदच्या आयुष्यात आणखी उलथापालथ घडवून आणेल.प्रिया रैना कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून प्रवेश करेल आणि व्हाईस प्रिंसिपल पदासाठी विनोद खन्नाला आव्हान देईल. चेहऱ्यावर अतिशय गोड पण मनातून ती अतिशय धूर्त आहे.मिस रस्तोगी विनोद खन्नाच्या मार्गात जमतील तेवढे अडथळे आणण्याचा प्रयत्न करेल.तिच्या गोड गोड बोलण्याने ती प्रिंसिपल श्री.तनेजा यांना प्रभावित करेल. मि.तनेजा असेही नेहमीच विनोदला मिस रस्तोगीकडून गोष्टी शिकण्याचे सल्ले देत असतात. ती सगळी कामं विनोद खन्नाकडून करून घेईल मात्र त्याचे श्रेय स्वतः मिळवेल.याबद्दल प्रिया रैना म्हणाली, “मी काही भाग पाहिले आहेत आणि मला ह्या शो ची संकल्पना आवडली. ह्या शो चा हिस्सा बनताना मला खूप आनंद होत असून माझी भूमिकासुद्धा रोचक आहे. मी प्रथमच थोडी खलनायकी भूमिका रंगवणार असून तशी असली तरीही ती विनोदी आहे.परिवार आणि कॉलेजमधील विद्यार्थी आता यांच्या जोडीला विनोदच्या आयुष्यातील खूप साऱ्या दर्दमध्ये आता माझी भर पडणार आहे.”ती पुढे असेही म्हणाली, “चित्रीकरणाच्या बरेच आधीच मला विचारण्यात आले होते पण काही बदलांमुळे माझ्या प्रवेशाला उशीर झाला.ज्याप्रकारे माझी व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे त्याबद्दल मी खुश आहे.”