Join us

प्रिया बापटने शेअर केली सोशल मीडियावर ट्रॅव्हल डायरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 13:11 IST

उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे.

उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळेच आज तिच्याकडे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते.

अभिनेत्री प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. सध्या प्रिया तुर्कीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. इन्स्टाग्रामवर प्रियाने तुर्कीमधील फोटो शेअर केला आहे.  प्रियाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

प्रियाने चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. नवा गडी नवं राज्य या नाटकात तसेच अधुरी एक कहानी, शुभंकरोती, दे धमाल, आभाळमाया यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवली आहे.

टॅग्स :प्रिया बापट