Join us

हॉलिडे च्या मूड मध्ये प्रिया आणि उमेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 05:38 IST

प्रिया  बापट आणि उमेश  कामत या जोडीला  मराठीचित्रपटसृष्टीतील हॉट कपल म्हणून ओळखले जाते. आता ही सर्वांची लाडकी जोडी हॉलिडे ...

प्रिया  बापट आणि उमेश  कामत या जोडीला  मराठीचित्रपटसृष्टीतील हॉट कपल म्हणून ओळखले जाते. आता ही सर्वांची लाडकी जोडी हॉलिडे च्या मूड मध्ये दिसत आहे. सातत्याने काम केल्या नंतर कुठेतरी,  शांत ठिकाणी सुट्टीला जाण्याची इच्छा सर्वांना होते. त्यामुळे आॅस्ट्रेलिया मधील सिडनी या शहरात सध्या हे दोघे फिरायला गेले आहेत. एकदा तरी बाहेरचे  देश पाहण्याची इच्छा ही प्रत्येकाची असते. सर्वसामान्यांप्रमाणे  प्रियाची सुद्धा हीच इच्छा तिच्या प्रिय हबी ने म्हणजेच उमेश ने  पूर्ण केली आहे. मुळातच प्रियाला नवीननवीन ठिकाण पाहायला फार आवडतात. त्यामुळे  तर उमेशने हा लॉन्ग ट्रीप चा प्लॅन केला असावात. नेहमीच पार्टी , मस्तीच़्या मूड मध्ये असलेले हे कपल आता  सिडनी मध्ये धम्माल करत असणार ह ेनक्कीच..