Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिन्स नरूला व युविका चौधरी दिसणार ह्या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 11:40 IST

अॅण्ड टिव्हीवरील 'लाल इश्क' या मालिकेतून प्रिन्स व युविका यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्दे'लाल इश्क' मालिकेत प्रिन्स व युविकाची केमिस्ट्रीप्रिन्स व युविका पहिल्यांदाच करताहेत मालिकेत एकत्र काम

छोट्या पडद्यावरील कलाकार प्रिन्स नरूला व युविका चौधरी यांनी एका रिएलिटी शोमध्ये एकत्र काम केले. तिथे त्यांच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली आणि हे जोडपे लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. मात्र त्यापूर्वी हे दोघे मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅण्ड टिव्हीवरील 'लाल इश्क' या मालिकेतून प्रिन्स व युविका यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'लाल इश्क' मालिकेतील एका भागात प्रिन्स व युविका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या भागातील कथा त्यांच्या प्रेमकथेपेक्षा खूप वेगळी आहे. सुपरनॅचरल गोष्टींचा शोध घेत जाणारी ही कथा आर्यन (प्रिन्स) आणि शिखा (युविका)च्या सुंदर लग्नाची कहाणी उलगडते.आपल्या जोडीदारासोबत पहिल्यांदाच मालिकेत काम करण्याबाबत युविकाने सांगितले की, 'प्रिन्स आणि मी एकत्र पडद्यावर यावे अशी अनेक चाहत्यांची इच्छा होती आणि लाल इश्कने इतक्या चांगल्या कथेद्वारे ती संधी आम्हाला दिली. कथा किंवा माझ्या पात्राबद्दल काही शंकाच नव्हती, त्यामुळे कथा सोडण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय प्रेक्षकांसाठी हा उत्तम भाग असणार आहे, अशी माझी खात्री आहे.'तर प्रिन्स म्हणाला की, ''लाल इश्क'मध्ये एकत्र काम करण्यासाठी युवि आणि मी अतिशय उत्सुक होतो. आमच्या चाहत्यांनाही आम्ही पडद्यावर एकत्र काम करावे असे वाटतच होते. कथा अतिशय उत्साहवर्धक आणि अचानक वळण घेणारी असल्याने आम्हाला शूटिंग करताना खूपच मजा आली. आम्हा दोघांपैकी कुणी असे काम केलेले नव्हते, म्हणून आमचा उत्साह द्विगुणित झाला होता. या भागाबद्दलची प्रेक्षकांची प्रतिक्रिया बघण्यासाठी आता आम्ही उत्सुक आहोत. अर्थात, युविकाबरोबर रोमान्स करण्याची आणखी एक संधी यामुळे मला मिळाली आहे.'