सेठजी ही मालिका सुरू व्हायच्याआधी प्राची ठक्करने घेतले देवाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 17:17 IST
प्राची ठक्करने कसोटी जिंदगी की, हवन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. प्राचीने अभिनेता पंकित ठक्करसोबत काम केल्यानंतर मालिकांमध्य काम ...
सेठजी ही मालिका सुरू व्हायच्याआधी प्राची ठक्करने घेतले देवाचे दर्शन
प्राची ठक्करने कसोटी जिंदगी की, हवन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. प्राचीने अभिनेता पंकित ठक्करसोबत काम केल्यानंतर मालिकांमध्य काम करणे बंद केले होते. त्यामुळे ती गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर होती. पण काही महिन्यांपूर्वी तिने नीले छत्रीवाले या मालिकेद्वारे कमबॅक केला. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेनंतर आता प्राची पुन्हा एका मालिकेत काम करणार आहे.सेठजी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत प्राची एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेतील प्राचीची भूमिका खूपच चांगली आणि सशक्त असणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेच्या यशासाठी तिने नुकतीच या मालिकेच्या टीमसोबत काही देवळांमध्ये जाऊन प्रार्थना केली. ही मालिका सुरू कधी होणार याची मालिकेच्या सगळ्या टीमला उत्सुकता लागली आहे. या मालिकेतील भूमिकेविषयी प्राची सांगते, "सेठजी या मालिकेतील माझी भूमिका खूप चांगली असून मला काम करताना खूपच मजा येत आहे. या मालिकेच्या यशासाठी आम्ही नुकतीच काही देवळांमध्ये जाऊन प्रार्थना केली. देवळात जाऊन दर्शन घेण्याचा अनुभव खूपच चांगला होता. मी आजवर माझ्या कारकिर्दीत साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी भूमिका आहे. मी याआधी कधीही इतकी सशक्त भूमिका साकारली नसल्याने ही मालिका सुरू व्हायची मी आतुरतेने वाट पाहात आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळी प्राची पाहायला मिळणार असल्याने माझ्या फॅन्सच्या प्रतिक्रियांसाठी मी उत्सुक आहे. या मालिकेच्या प्रमोशनला मी लवकरच सुरुवात करणार आहे."