Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कौन बनेगा करोड़पती 9च्या सेटवर महिला क्रिकेटर्सने लावली उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 15:27 IST

कौन बनेगा करोडपती 9 या रिअॅलिटी गेम शोच्या पहिल्याच भागात काही महिला स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या महिला ...

कौन बनेगा करोडपती 9 या रिअॅलिटी गेम शोच्या पहिल्याच भागात काही महिला स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या महिला स्पर्धक कोणी साध्या नसून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपले नाव जगभरात कमावले आहे. 2017 च्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मिताली राज, हर्मनप्रीत कौर, स्मृती मांढणा, पुनम राऊत, वेद कृष्णमूर्ती, झुलन गोस्वामी आणि दिप्ती शर्मा कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या भागात उपस्थित राहाणार आहेत. यासाठी त्यांनी नुकतेच चित्रीकरण केले. अमिताभ बच्चन यांनी प्रत्येक खेळाडूशी हात मिळवून आणि त्यांच्या उत्कृष्ट विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.स्मृती मांढणा ही अरिजित सिंगची खूप मोठी आहे. कौन बनेगा करोडपतीच्या चित्रीकरणाला येण्याआधी स्मृतीला अरजितची व्हॅनिटी व्हॅन दिसली होती. त्याला एकदा भेटायची तिची इच्छा देखील होती. परंतु शूटला जायचे असल्याने त्याला भेटायला जाणे स्मृतीसाठी शक्य नव्हते. स्मृतीला अरजितला भेटायचे आहे हे केबीसी 9 च्या टीमला कळताच त्यांनी लगेचच अरिजित सिंगला तिच्याशी फोनवर बोलण्याची विनंती केली. अमिताभ बच्चन यांनी स्मृतीला सरप्राईज देण्यासाठी स्टेजवर बोलावले आणि तुझ्या एका मित्राला तुझ्याशी बोलायचे आहे असे तिला सांगितले आणि फोन लावून दिला. समोरच्या व्यक्तिचा आवाज ऐकताच स्मृतीला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. त्याच्याशी काय बोलू नि काय नाही अशी स्मृतीची अवस्था झाली होती. अरजितने स्मृतीशी  खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि त्यानंतर “चन्ना मेरेया” हे स्मृतीचे आवडते गाणे देखील गायले. मैदानात जाण्यापूर्वी स्मृती अनेकवेळा हे गाणे ऐकते.  महिला क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूला कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर बसून गेम खेळण्याची संधी मिळाली. या सगळ्यांनी या रिअॅलिटी शो मधून जिंकलेली रक्कम सोसायटी ऑफ सोशल डेव्हलपमेंटला देण्यात आली. Also Read : अमिताभ बच्चनसोबत अभिषेक बच्चनही दिसणार कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात