Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणा शर्माने घेतले सरदारजीचे रूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 20:40 IST

स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत प्रेरणाला आपल्यासमोर येणाऱ्या आव्हानांना थेट सामोरी जाताना पाहायला मिळणार आहे.

कथानकाला मिळत असलेल्या अनपेक्षित कलाटण्यांमुळे स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी जिंदगी के’ या लोकप्रिय मालिकेच्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढीस लागली आहे. होळी विशेष भागात अनुराग आणि प्रेरणा यांच्यातील प्रेम प्रसंगाबरोबरच प्रेक्षकांनी पाहिले की कोमोलिका भांगेच्या नशेत असलेल्या प्रेरणाच्या घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेते. आता आगामी भागात आपल्या नकळत झालेली ही चूक दुरुस्त करण्यासाठी प्रेरणा सरदारजीचा वेश घेताना दिसेल.

मालिकेशी संबंधित एका सूत्राने सांगितले, “होळी विशेष भागात प्रेरणाला भांगेच्या नशेत बघून कोमोलिका तिच्याकडून घटस्फोटाच्या कागदपत्रांवर तिची स्वाक्षरी घेताना दिसली. पण प्रेरणाला जेव्हा ही गंभीर चूक लक्षात येते, तेव्हा तीमनातून कोसळून पडत नाही. उलट कोमोलिकाला अनुरागच्या जीवनातून दूर करण्यासाठी ती एक योजना बनविते. ती आता एका शीख व्यक्तीचा वेश धारण करून बसू हाऊसमध्ये येते आणि कोमोलिकाने तिच्याकडून जे हिसकावून घेतलेले असते, ते पुन्हा परत मिळविण्याचा प्रयत्न करते. या भागाच्या प्रोमोमध्ये प्रेरणाची सरदारजीच्या अवतारातील झलक पाहायला मिळेल. आता प्रेरणाने अशी कोणती योजना बनविली आहे, ते पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागली आहे.”स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत प्रेरणाला आपल्यासमोर येणाऱ्या आव्हानांना थेट सामोरी जाताना पाहायला मिळणार आहे. आता प्रेरणा हे नवे आव्हान आणि कोमोलिकाचा कसा मुकाबला करते, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2एरिका फर्नांडिस