भव्य युद्धाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 17:37 IST
बाहुबली या चित्रपटात उत्तरार्धात दाखवण्यात आलेले युद्ध प्रेक्षकांना खूपच आवडले होते. यासाठी या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच स्टंट डायरेक्टर पीटरचेही कौतुक ...
भव्य युद्धाची तयारी
बाहुबली या चित्रपटात उत्तरार्धात दाखवण्यात आलेले युद्ध प्रेक्षकांना खूपच आवडले होते. यासाठी या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच स्टंट डायरेक्टर पीटरचेही कौतुक करण्यात आले होते. सिया के राम या मालिकेत लवकरच युद्धाच्या दृश्यांचे चित्रीकरण केले जाणार आहे. ही दृश्यं अगदी खरीखुरी दिसावीत यासाठी बाहुबलीचे स्टंट डायरेक्टर पीटर यांची मदत घेतली जाणार आहे. या दृश्यांचे चित्रीकरण करताना पीटर सेटवर स्वतः उपस्थित राहाणार आहेत. आतापर्यंत छोट्या पडद्यावर प्रेक्षकांनी पाहिलेल्या युद्धापेक्षा हे युद्ध अतिशय भव्य दिसावे यासाठी सध्या मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. हैद्राबादच्या रामोजी सिटीमध्ये या युद्धाच्या दृश्यांचे चित्रीकरण केले जाणार आहे.