Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा होणार शेवट; मुख्य अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोची चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:14 IST

'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा होणार शेवट, जाणून घ्या...

Premachi Goshta:  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट. अभिनेता राज हंचनाळे, स्वरदा ठिगळे तसेच अपूर्वा नेमळेकर या कलाकारांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे. ४ सप्टेंबर २०२३ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. मालिकेतील मुक्ता-सागरच्या जोडीने प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. टीआरपीच्या शर्यतीत कायम टॉप-५ मध्ये ही असणारी मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आपल्या कुटुंबासाठी धडपडणारी मुक्ताची कहाणी अनेकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र, २०२५ मध्ये तेजश्री प्रधानने एक्झिट घेतल्यानंतर त्याचा परिणाम मालिकेवर झाला. सुरुवातीला रात्री ८ ला प्रसारित होणारी ही मालिका आता दुपारी १ च्या स्लॉटला दाखण्यात येते. त्याच जागी समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांची आगामी मालिका हळद रुसली, कुंकू हसलं प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे ही मालिका लवकरच बंद होणार असल्याचं कळतंय. 

दरम्यान, नुकतीच सोशल मीडियावर अभिनेता  राज हंचनाळेने एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीने मालिका रसिकाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या स्टोरीमध्ये अभिनेत्याने मालिकेच्या सक्रिप्टचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये सागर मुक्ताला म्हणतो, तुमच्यामुळे घराला, मला पूर्णत्व मिळालं...", तसेच "अंत अस्ति प्रारंभ...", असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया