Join us

पसंत आहे मुलगी घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 10:43 IST

पसंत आहे मुलगी टीआरपीच्या रेसमध्ये सध्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा, रेशम प्रशांत आणि अभिषेक देशमुख या प्रमुख कलाकारांचा ...

पसंत आहे मुलगी टीआरपीच्या रेसमध्ये सध्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा, रेशम प्रशांत आणि अभिषेक देशमुख या प्रमुख कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेकडे सुरुवातीला प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. पण काही महिन्यांनंतर या मालिकेला प्रेक्षकांचे मन जिंकता आले. ही मालिका आता प्रेक्षकांना आवडायला लागली असतानाच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी माझ्या नवऱ्याची बायको ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.