Join us

"प्रत्युषाला तिचे वडीलच...", अभिनेत्रीबद्दल एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंहचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 16:23 IST

'बालिका वधू'सारखंच तिचं कमबॅक व्हावं अशी इच्छा होती....

'बालिका वधू'फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने (Pratyusha Banerjee) २०१६ साली आत्महत्या केली. यामुळे सर्वच चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. प्रत्युषा तेव्हा अभिनेता राहुल राज सिंहसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांमध्ये काहीतरी बिनसलं. नंतर त्यानेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा त्याच्यावर आरोप झाला. त्याला अटकही झाली मात्र नंतर जामिनावर सुटका झाली. प्रत्युषाने आत्महत्या का केली याचं कारण मात्र शेवटपर्यंत कळलंच नाही. या प्रकरणामुळे राहुल राजचं करिअरही संपलं. आता नुकतंच त्याने एका मुलाखतीत काही खुलासे केले आहेत.

राहुल राज सिंहने याआधीही काही मुलाखतींमध्ये प्रत्युषाबाबतीत काही खुलासा केले होते. यामध्ये त्याने प्रत्युषाला दारुचं व्यसन होतं खुलासा केला होता. आता तो प्रत्युषाचे वडीलच तिला दारु प्यायला द्यायचे असं म्हणाला आहे.  बॉलिवूड बबलशी बोलताना राहुल राज म्हणाला, "मी प्रत्युषाच्या आयुष्यात येण्याच्या आधीच तिला दारुचं व्यसन होतं. आम्ही कलाकार आहोत, पोट वगरे सुटू नये याची आम्हाला काळजी घ्यावी लागते. म्हणून मी तिला समजवायचो. ती माझ्यासोबत राहायची तेव्हा मी तिला हेच म्हणायचो की असंच पित राहिलो तर नुकसान होईल. तिला काम करण्यात फार रस नव्हता. मला मोठ व्हायचं होतं, नाव कमवायचं होतं. मी तिला म्हणालो की माझ्यासमोर दारु ठेवलीस तर मलाही सवय लागेल."

तो पुढे म्हणाला, "प्रत्युषा तिच्या वडिलांसोबत खूपच फ्रेंडली होती. तिचे वडील दारु प्यायल्यानंतर गुंड असल्यासारखे वागायचे. दोघांचं खूप भांडणंही व्हायचं. मी तिची सवय थोडी थोडी कमी करत होतो. तिला मी डायरी दिली होती. त्यात तिला आज सकाळी प्यायची नाही असं लिहायला लावायचो. मीही लिहायचो. मी त्यावेळी एका मालिकेसोबत प्रत्युषासाठी बोलणंही करुन देत होतो. एका लेखकालाही मी बोलवलं होतं जेणेकरुन प्रत्युषाला चांगलं काम मिळेल. प्रत्युषाचं कमबॅक एकदम बालिका वधूसारखं व्हावं अशी माझी इच्छा होती."

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन