Join us

प्रथमेश-मुग्धाचा साखरपुडा, 'लिटिल चॅम्प्स' चा पारंपरिक लुक बघितलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 09:06 IST

वाङ्निश्चय! मोदक आणि मॉनिटरच्या साखरपुड्याचे फोटो बघितले का

'सारेगमप' लिटिल चॅम्प्स मुळे प्रसिद्धीझोतात आलेले गायक प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) यांनी काही महिन्यांपूर्वीच जाहीररित्या प्रेमाची कबुली दिली होती. तर आता कालच दोघांचा साखरपुडाही पार पडला आहे. दोघांनी पारंपारिक वेशातील सुंदर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

पिवळ्या रंगाचा काष्टा आणि लाल ब्लाऊज अशा लुकमध्ये मुग्धा तयार झाली. त्यावर तिने साजेसे दागिने घातले आहेत. मुग्धाचा हा सरळ साधा लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे. तर प्रथमेशने मरुन रंगाचा झब्बा घातला घातला आहे आणि डोक्यावर टोपी आहे. दोघांचाही हा पारंपारिक लुक पाहून चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. या फोटोंना त्यांनी 'वाङ्निश्चय' असं कॅप्शन दिलं आहे. याचाच अर्थ त्यांचा साखरपुडा उरकला असून लवकरच दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. 

प्रथमेश मुग्धाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. मोजक्या लोकांमध्येच हा सोहळा पार पडला आहे. यासह त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अभिनेत्री स्पृहा जोशी जी प्रथमेशची नात्याने सून आहे तिनेही अभिनंदनपर कमेंट केली आहे. विशेष म्हणजे मुग्धाची बहीण मृदुल वैशंपायन सुद्धा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या दोन्ही बहिणींचे ठिकठिकाणी केळवण सुरु आहेत ज्याचे फोटो त्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. प्रथमेश आणि मुग्धा सध्या गाण्याच्या कार्यक्रमांमध्येही व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे दिवाळी पहाटचे कार्यक्रम होणार आहेत.

टॅग्स :सा रे ग म पलग्नसेलिब्रिटी