Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सूर नवा ध्यास नवा” मधील प्रसेनजीत कोसंबीला अवधूत गुप्ते कडून भेट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 09:30 IST

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने ...

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांनी कॅप्टनसची मने जिंकली. अवधूत गुप्ते यांनी कार्यक्रमामधील त्यांच्या लाडक्या प्रसेनजीत कोसंबीला त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये गाणे गाण्याची संधी दिली असून, त्या गाण्याचे रेकॉर्डिंग ३ मे रोजी होणार आहे.कार्यक्रमादरम्यान “त्याचं गाणं झालं.. आणि मंचावरील सगळेच मंत्रमुग्ध झाले ! तो नेहमीच छान गायचा पण, आजचा त्याचा नूर काही औरच होता ! आणि म्हणुनच समोर बसलेल्या परिक्षकाकडून नेहमिच “मित्रा जिंकलंस ! मित्रा तोडलंस !” ही दाद त्याला मिळायची. पण, त्यापलिकडे जाऊन दाद म्हणून, बक्षीस म्हणून  मिळालं एक वचन. “मित्रा.. मी वचन देतो ! माझ्या पुढील चित्रपटात तू पार्श्वगायक म्हणून झळकशील !” होय! तो मंच होता ‘सूर नवा ध्यास नवा’ चा, परिक्षक अर्थातच अवधूत गुप्ते आणि तो गायक म्हणजे प्रसेनजीत कोसंबी. तसं पहाता रिअॅलिटी शोज्च्या मंचावर अशी अनेक वचनं दिली जातात..पण हे मात्र पाळलं गेलं ! अवधूतला जेव्हा वाघिर्या आगामी चित्रपटासाठी प्रमोशनल गाणं करायची संधी मिळाली तेंव्हा त्याला आपलं वचन आठवलं आणि दिलेले वचन पूर्ण केले. याबद्दल बोलताना प्रसेनजीत कोसंबी म्हणाला, “सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम नुकताच संपला आहे. पण, मला या कार्यक्रमातील स्पर्धक मित्र, कॅप्टनस या सगळ्यांची आठवण अजूनही येते. खूपच छान अनुभव होता या कार्यक्रमादरम्यानचा. या कार्यक्रमाने मला एक नवी ओळख दिली. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमा दरम्यान आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अवधूत दादाने मला सांगितलं होत कि, मी तुला नक्की गाण्याची संधी देईन. आणि आता कार्यक्रम संपून फक्त एकच महिना होतो आहे आणि मला त्याने त्याच्या चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली. या निमित्ताने मला अवधूत गुप्ते यांच्यासोबत मला गाणे गाण्याची संधी मिळत आहे याचा खूप आनंद होत आहे.