Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद ओक म. फुले यांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 16:06 IST

 Exculsive -  बेनझीर जमादार महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची पानं उलगडत, या मातीतील काही थोर आणि क्रांतीकारी व्यक्तींच्या कथा सांगणारी आवाज ही ...

 Exculsive -  बेनझीर जमादार महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची पानं उलगडत, या मातीतील काही थोर आणि क्रांतीकारी व्यक्तींच्या कथा सांगणारी आवाज ही मिनी सिरीजमध्ये आता अभिनेता प्रसाद ओक हा समाजसुधारक महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. महात्मा पुले यांनी समाजामध्ये केलेले कार्य या मिनीसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असणार आहे. तसेच घरातील प्रत्येकाला गुंतवून ठेवण्यात आणि जगण्याची प्रेरणा देण्यात आवाज ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना देखील दिसत आहे. नुकतेच या मालिकेत अभिनेता सौरभ गोखले देखील ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका साकारताना आपण पाहिले आहे. सौरभने तर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. चला, तर आता पाहूयात अभिनेता प्रसाद ओक देखील महात्मा फुले यांच्या प्रेक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांचा पसंती उतरतो का ? }}}}