Join us

Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:37 IST

Pranit More Roasts Bigg Boss Contestants : फरहाना, कुनिका, तान्याबद्दल काय म्हणाला प्रणित मोरे, बघा व्हिडिओ

बिग बॉस १९ (Bigg Boss 19) ला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. यंदा बिग बॉसमध्ये मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More)  आहे. प्रणितचे महाराष्ट्रभर स्टँडअप शो गाजले होते. वीर पहाडियाची मस्करी केल्याने त्याला मारहाण झाली होती म्हणून तो मध्यंतरी चर्चेत आला होता. आता त्याने थेट सलमान खानच्या बिग बॉस १९ मध्ये एन्ट्री घेतली. गेल्या आठवड्यात वीकेंड का वार मध्ये सलमान खानने प्रणितची चांगलीच शाळा घेतली होती. प्रणितने सलमानवर याआधी बरेच जोक केले आहेत तेच पाहून सलमानने प्रणितला चार गोष्टी सुनावल्या होत्या. मात्र आता बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये प्रणित मोरेने सिक्सर मारला आहे. 

बिग बॉसने नुकताच सदस्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याचा टास्क दिला. द बिबि शो' असं या टास्कचं नाव होतं. या टास्कमध्ये आवेज दरबारने त्याचं डान्सिंग टॅलेंट दाखवलं. तर अमाल मलिकने ऑन द स्पॉट गाणं कंपोज करुन गायलं. त्याचं गाणं ऐकून सगळेच मंत्रमुग्ध झाले. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नंतर प्रणित मोरे आला आणि त्याच्या जोक्सने वातावरण एकदम हलकं केलं. सगळे नुसते पोट धरुन हसत होते. प्रणितने घरातील प्रत्येक सदस्यांवर जोक केले. कोणाच्याही भावना दुखावणार नाही अशाच प्रकारचे ते जोक होते. फरहाना, कुनिका, तान्या या सर्वांची मस्करी केली. 

प्रणितला कमेंट्स सेक्शनमध्ये फुल पाठिंबा मिळत आहे. प्रणित खरा कॉमेडियन आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. तसंच सर्व स्पर्धकांचं अगदी अचूक निरीक्षण करत त्याने सर्वांची चेष्टा केली जे प्रेक्षकांना खूप आवडलं. प्रणितचा हा कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

टॅग्स :बिग बॉसकलर्स