Join us
Daily Top 2Weekly Top 5

शूटिंगवेळी रक्ताचे डाग असलेली साडी दिली गेली, अलका कुबल यांनी लावलेले आरोप चुकीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 16:24 IST

‘आई माझी काळुबाई’ मालिका नुकतीच सोडली. तिच्या मालिका सोडण्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

‘आई माझी काळुबाई’ मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या मालिका सोडल्यावर अलका कुबल यांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ता मालिकेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे सांगितले. प्राजक्ता सेटवर उशिरा यायची, तिच्यामुळे मालिकेचे चित्रीकरण थांबवावे लागायचे, तिच्या कामात आईचा हस्तक्षेप असायचा, त्यामुळे तिला मालिकेतून काढून टाकल्याचे सांगितले होते.

 

सेटवर प्राजक्ताची गैरवर्तवणूकीमुळे आम्ही सगळेच त्रस्त झालो होतो अनेक गोष्टीचा खुलासा यावेळी त्यांनी केला होता. यावर प्रतिउत्तर देण्यासाठी प्राजक्ता गायकवाडनेही एक पत्रकार परिषदेचे आयोजन केले यावेळी मीडियासोर तिने आपली बाजु मांडली आहे.

 

अलका कुबल यांनी  केलेले आरोप प्राजक्ताने फेटाळून लावले आहेत. प्राजक्ता म्हणाली, माझ्या कामाला महाराष्ट्रातील जनतेने नेहमी कौतुकाची पावती दिली आहे. मी आजपर्यंतच्या सर्व भूमिका प्रामाणिकपणे केल्या आहेत. म्हणूनच माझ्या कामावर असे आरोप होत असल्याची मला खंत वाटते, असेही प्राजक्ता हिने या वेळी बोलताना सांगितले.

मी स्वतःहून  ‘आई माझी काळुबाई’ मालिका सोडली. मला कोणीही काढलेले नाही. मालिकांचे कलाकारच जर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असतील तर येथील वातावरण महिला कलाकारांसाठी सुरक्षित कसे असेल? त्यात अलका कुबल यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीने असे आरोप लावणे चुकीचे आहे. त्यांची भूमिका योग्य नाही.इतकेच काय तर  मला या मालिकेचं आतापर्यंत एकही दिवसाचं पेमेंट झालेलं नाही.

"माझ्यामुळे मालिकेचं शूटिंग कधीही रखडले गेले नाही. मी शूटिंग सोडून सुपारी घेते असा आरोप माझ्यावर झाला यात अजिबात तथ्य नाही. कोरोनामुळे सगळ्याच गोष्टी बंद असताना  इव्हेंटच झाले नाहीत.शूटिंगसाठी वापरण्यात येणारे कपडेही स्वच्छ नसायचे. एकदा तर मला रक्ताचे डाग असलेली साडी देण्यात आली होती. रक्ताचा डाग दिसताच माझ्या आईने ते निदर्शणार आणून दिले. त्यालाही तुम्ही माझ्या आईचा हस्तक्षेप म्हणता. 

 

टॅग्स :अलका कुबलप्राजक्ता गायकवाड