Join us

प्राजक्ता आणि भूषण पुन्हा एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 22:37 IST

प्राजक्ता माळी आणि भूषण प्रधान ही जोडी स्टॉबेरी आयस्क्रीम या चित्रपटामध्ये  प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची बातमी आम्ही तुम्हाला याआधी ...

प्राजक्ता माळी आणि भूषण प्रधान ही जोडी स्टॉबेरी आयस्क्रीम या चित्रपटामध्ये  प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची बातमी आम्ही तुम्हाला याआधी दिलीच होती. परंतू या  दोघांच्या फॅन्सला हा चित्रपट रिलीज होईपर्यंतची वाट पाहावी लागणार नाही,कारण लवकरच या दोघांचा फिलींग नावाचा अल्बम ही रिलिज होणार आहे. या अल्बम मध्ये प्राजक्ता आणि भूषण रोमॅण्टीक गाण्यांवर ठेका धरणार आहेत. या अल्बम मध्ये प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर आपल्या आवाजाने प्रेक्षकांना वेड लावायला येणार आहे. त्यामुळे प्राजक्ता व भूषणच्या फॅन्स साठी हा अल्बम पर्वणी ठरेल हे नक्कीच.