Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रबादिपच्या नृत्याने माधुरीला करुन दिली प्रभूदेवाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 16:29 IST

आठवड्याली आठवड्यात, डान्स दिवानेचे स्पर्धक त्यांच्या दिमाखदार कामगिरीने संपूर्ण देशाला प्रभावित करण्यासाठी मेहनत घेत आहेत. स्पर्धकातील एक प्रबादिप सिंन आपला डान्स परफॉर्मेन्स सादर करून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. 

आठवड्याली आठवड्यात, डान्स दिवानेचे स्पर्धक त्यांच्या दिमाखदार कामगिरीने संपूर्ण देशाला प्रभावित करण्यासाठी मेहनत घेत आहेत. स्पर्धकातील एक प्रबादिप सिंन आपला डान्स परफॉर्मेन्स सादर करून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. 

प्रबादिप सिंगला शोचा ब्लॅक हॉर्स समजले जाते त्याने त्याच्या आव्हानात्मक डान्सच्या कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले.  ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता नसून सुध्दा त्याने संपूर्ण अॅक्ट रिव्हर्स मध्ये केला. त्याला परीक्षक, सह-स्पर्धक आणि प्रेक्षकांनी उभे राहून वंदना दिली. त्याच्या कामगिरीने विस्मयचकित झालेल्या माधुरी दीक्षित म्हणाल्या, “ तुझ्या नृत्याने आज मला प्रभुदेवाची आठवण करून दिलीस, त्याला सुध्दा अशक्य हा शब्द माहित नव्हता. प्रभुदेवा हा माझा आवडता डान्सर आहे आणि त्यानंतर आता दुसरा आवडता तूच बनला आहेत. प्रबादिप हा क्षण खरोखरंच विशेष होता कारण त्या दिवसाची विशेष अतिथी रविना टंडनने सुध्दा मंचावर येऊन त्याला प्रेम आणि कौतुकाचे चिन्ह म्हणून हॉर्ट शेप बलून दिले. रविनाने कोरियोग्राफीच्या कल्पनेचे कौतुक केले आणि सांगितले की प्रबादिपने त्याच्या कमतरता त्याच्या शक्ती मध्ये बदलल्या आहेत.

माधुरीने रवीनाची देखील स्तुती केली तेव्हा भारावून गेलेल्या रवीनाने लगेच सांगितले, “आज मला जे काही हवे होते ते सगळे मिळाले असे मला वाटत आहे. कारण माधुरीने स्वतः या गाण्यातील माझ्या डान्सची स्तुती केली आहे. रवीनाने गंमतीने सांगितले, “हा माझ्यासाठी पप्पू पास हो गया सारखा क्षण आहे, कारण माझ्या डान्सच्या चालींची स्तुती दुसऱ्या कोणाकडून नाही तर माधुरी कडून झाली आहे. हा माझ्यासाठी खरोखरंच एक विशेष दिवस आहे.”

टॅग्स :प्रभू देवामाधुरी दिक्षित