इंडस्ट्रीतही गर्ल्स पॉवरचा दरारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 01:34 IST
आज आपण कोणतेही क्षेत्र जर पाहीले तर तिथे मुलींनी बाजी मारलेली दिसुन येते. आजच्या मुली ...
इंडस्ट्रीतही गर्ल्स पॉवरचा दरारा
आज आपण कोणतेही क्षेत्र जर पाहीले तर तिथे मुलींनी बाजी मारलेली दिसुन येते. आजच्या मुली कुठेच कमी नाहीत असे म्हणायला खरेतर काहीच हरकत नाही. ग्लॅमरच्या झगमगाटात सतत वावरणाºया चंदेरी दुनियेत सुद्धा या तारकांनी त्यांचा दबदबा निर्माण केला आहे. चित्रपटामध्ये हिरोईन के वळ शोपिस म्हणुन वापरली जाते अशी समजुत आता खोटी ठरत असुन नायिका चांगल्या दमदार सशक्त भुमिका साकारुन हम भी किसीसे कम नही हेच दाखवुन देत आहेत. आता पहा ना एका पुरस्कार सोहळ््या दरम्यान या सर्व तारका एकत्र जमुन मस्त धमाल मस्ती करताना दिसल्या. एवढेच नाही तर अनेक पुरस्कारांवर त्यांनी मोहोर देखील उमटविली असुन त्यांच्या कामाची पावती त्यांना पुरस्काराच्या रुपाने मिळाली आहे. अमृता खानविलकर,श्रृती मराठे, मानसी नाईक, सोनाली खरे, या अभिनेत्रींनी फुल टू धमाल करीत मस्त फोटोज काढून एंजॉय तर केलाच अन इंडस्ट्रीतील गर्ल्स पॉवर दाखवुन दिली.