छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत नुकतेच अभिषेक आणि अनघाचे लग्न पार पडले. त्यामुळे प्रेक्षक खूप खूश आहेत. दरम्यान या मालिकेत अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिने साकारली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकताच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत तिचा मालिकेतील लग्नानंतरचा लूक पाहायला मिळत आहे.
अनघा उर्फ अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती साडीत दिसते आहे. गळ्यात मंगळसूत्र पाहायला मिळत आहे. तिने हा फोटो शेअर करत सकारात्मक राहा असे लिहिले आहे. अश्विनीचा हा फोटो पाहून मालिकेतील तिचा लग्नानंतरचा लूक असल्याचे बोलले जात आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.