Join us

पोश्टर गर्लची हटके अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 00:42 IST

        अप्सरा आली या गाण्यातून आपल्या नृत्याच्या अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ करणारी आपली पोश्टर गर्ल सोनाली कुलकर्णी ...

        अप्सरा आली या गाण्यातून आपल्या नृत्याच्या अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ करणारी आपली पोश्टर गर्ल सोनाली कुलकर्णी सध्या जाम खुश दिसत आहे. सोनालीला नेहमी वेगळे लुक करायला आवडतातच. ती सतत तिच्या चाहत्यांसमोह वेगळ््या हटके अंदाजातच येत असते. मग एखादा चित्रपट असो, कार्यक्रम असो किंवा पार्टी सोनालीचे वेगळे लुक्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी पहायला मिळतात. सोनाली ज्याप्रकारे टॅÑडीशनल लुक कॅरी करते तशीच ती वेस्टर्न आऊटफिटस मध्येही ब्युटिफुल दिसते. चित्रपटांमध्ये तिला अनेकदा लावणीसाठी आपण नऊवारीमध्ये पाहीले आहे. असाच एक नऊवारीतील अस्सल ठसकेबाज लुकमधील सोनालीचा फोटो सध्या सोशल साईटवर वायरल झाला आहे. यामध्ये तिने डार्क पिंक कलरच्या काठाची नऊवारी घातली असुन नाकात नथ, कानात झुमके, टिकली अन गळ््यात साज घालुन एकदम ट्रॅडीशनल अंदाजाच दिसत आहे. सोनालीच्या या फोटोवर तिचे चाहते  नक्कीच फिदा झाले असणार.