Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पोरस फेम रोहित पुरोहित या जागेच्या पडला प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 10:27 IST

पोरस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाचे, ...

पोरस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाचे, या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेचे प्रेक्षक कौतुक करत आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. पोरस या मालिकेचे चित्रीकरण सध्या उंबरगाव येथे सुरू आहे. त्यामुळे लक्ष लालवानी, आदित्य रेडजी, रती पांडे, समीक्षा, रोहित पुरोहित आणि टीममधील सगळेच कलाकार आणि तंत्रज्ञ तिथेच राहात आहेत. बर्‍याचशा अभिनेत्यांना आपल्या कुटुंबापासून लांब, शहराच्या हद्दीबाहेरील राहणे आवडत नाही. पण या मालिकेत अॅलेक्झांडरचे काम साकारत असलेल्या रोहितला याबद्दल कुठलीच तक्रार नाहीये. त्याने उंबरगाव येथील वातावरणाशी छान जुळवून घेतले आहे. मालिकेच्या सेटपासून जवळच असलेल्या समुद्रकिनार्‍याच्या तर तो प्रेमातच पडला आहे. याविषयी रोहित सांगतो, “उंबरगाव ही सुंदर जागा आहे आणि येथील समुद्रकिनारा अद्भुत आहे. मला जेव्हा थोडा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा मी बीचवर जातो. तिथले वातावरण खूपच छान असल्याने मला तिथे एकप्रकारची शांतता मिळते. मला तिथे विचार करायला निवांत वेळ मिळतो. पोरस ही माझी मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मालिकेला आणि माझ्या भूमिकेला मिळत आहे. तुमचे काम वाखाणले जाणे ही तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. आम्ही करत असलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळत आहे. तुमच्या परिवाराची आणि मित्रांची उणीव भासत असताना काम करणे हे आव्हानात्मक असते. पण आता मला या परिस्थितीची सवय झाली आहे आणि पोरस या मालिकेतील मंडळी ही आता एखाद्या कुटुंबासारखीच झाली असल्याने आम्ही खूप मजा मस्ती करतो. पौरव राष्ट्रातून पर्शियन लोकांचा व्यापार नष्ट करून त्यांना देशाबाहेर हाकलण्याची एक योजना पोरस आखणार आहे. ही योजना कशी असणार आणि पोरस या योजनेत यशस्वी होणार का हे प्रेक्षकांना आगमी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.Also Read : ​पोरस मालिकेतील सनी घनशानीला मेकअप करण्यासाठी लागतो दोन तासाहून अधिक वेळ